Bramha Mishra Death : प्रसिद्ध वेब सिरीज 'मिर्झापूर'मधील (Mirzapur) मुख्य पात्र मुन्ना भैय्याचा खास मित्र असणाऱ्या ललितचे (Mirzapur Lalit) पात्र साकारणारे ब्रह्मा मिश्रा याचं निधन (Bramha Mishra Death) झालं आहे. सिरीजमधील मुन्ना भैय्या अर्थात दिव्येंदू शर्मा याने इन्स्टाग्राम पोस्टवर ब्रह्मासोबतचा फोटो शेअर करत दुख: व्यक्त केलं आहे. त्याने पोस्टमध्ये RIP लिहित, 'आपला ललित आपल्यासोबत नसून त्याच्यासाठी सर्वजण प्रार्थना करु असं लिहिलं आहे. दरम्यान ब्रह्माच्या निधनामागील नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.


अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटात झळकलेला ब्रह्मा याला खरी प्रसिद्धी मिर्झापूरच्या ललितच्या रोलनेच मिळवून दिली. पहिल्या पार्टमध्ये अधिक नजरेत न आलेल्या ललितने दुसऱ्या पार्टमध्ये मात्र सर्वांचीच मनं जिंकली. सिरीजमध्ये त्याच्या पात्राचं निधनही मनाला चटका लावणारं होतं. दरम्यान त्याने स्वत:ही एका मुलाखतीत मिर्झापूरमधील ललितचं पात्र माझ्यासाठी सर्वात बेस्ट रोल होता आणि त्याने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली असंही सांगतिलं.



भोपाळरुन अभिनेता बनायला आलेल्या ब्रह्माने 2013 मध्ये चोर चोर सुपर चोर या चित्रपटातील एका रोलने बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेक छोट्या-मोठ्या चित्रपटात काम केलेल्या ब्रह्माला मिर्झापूरमधील ललित पात्राने खरं फेम मिळवून दिलं. दरम्यान ब्रह्मा हा अभिनेता मनोज वाजपेयीला आपला रोल मॉडल मानत असल्याचं त्याने एका सोशल मीडियापोस्टमधून स्वत: सांगितलं होतं.


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha