BARK India TRP Report : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सलमान खान (Salman Khan) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) हे मोठ्या पडद्यावरचे सुपरस्टार आहेत. या बड्या कलाकारांचे सिनेमे कोट्यवधींचा व्यवसाय करत असतात. पण तरी या तिघांचे छोट्या पडद्यावरील शो पहिल्या दहातदेखील आले नाहीत. बार्कच्या गेल्या पाच आठवड्यातील रेटिंगमध्ये हे समोर आले आहे.


बार्कच्या रेटिंगनुसार अमिताभ बच्चन यांचा 'केबीसी' सीजन 13, सलमान खानचा 'बिग बॉस 15' आणि रणवीर सिंहचा 'द बिग पिक्चर' टॉप टेनमध्ये स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे. एवढंच नव्हे तर कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो'देखील टॉप 10 मध्ये जागा मिळवू शकलेला नाही. बिग बॉसचा टीआरपी कमी झाल्याने निर्मात्यांनी शो लवकर संपवण्याचा निर्णय घेतला आहे. रणवीर सिंहनेही 'द बिग पिक्चर' या शोमधून छोट्या पडद्यावर आगमन केले होते. मात्र प्रेक्षकांनी त्यालादेखील नाकारले आहे. बार्कच्या रेटिंगनुसार गेल्या वर्षी आलेली मालिका 'अनुपमा' मालिका क्रमांक एकवर आहे. 


रुपाली गांगुली, सुधांशु पांडे आणि मदालसा शर्माची 'अनुपमा' मालिका आणि नील भट्ट, आयशा सिंह, ऐश्वर्या शर्माच्या 'गुम गै किसी के प्यार में' या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. कमी कालावधीत 'अनुपमा' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. सोशल मीडियावरदेखील मालिकेची लोकप्रियता पाहायला मिळते. त्यामुळेच ही मालिका टीआरपीतदेखील अव्वल स्थानी आहे.  


इमली मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ
इमली मालिकेच्या रेटिंगमध्ये थोडे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बार्कच्या रेटिंगनुसार इमली मालिका चौथ्या स्थानावरून आता तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मालिकेत आता रंजक वळणे येणार आहेत.  


संबंधित बातम्या


Kamal Haasan : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन कोरोनामुक्त


Mamata Banerjee Meet Swara Bhasker : स्वरा भास्करने घेतली ममता बॅनर्जींची भेट, म्हणाली...


Money Heist Season 5 : मनी हाईस्टचा शेवटचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चोरी यशस्वी होणार का?