The Railway Men :  यशराज फिल्म्स (Yashraj Films) या प्रोडक्शन हाऊसच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती नेहमी मिळते. आता यश राज फिल्म्स प्रोडक्शन हाऊस हे चित्रपटांबरोबरच वेब सीरिजची देखील निर्मीती करणार आहे. नुकतीच यशराज फिल्म्सने त्यांच्या 'द रेल्वे मेन' या वेब सीरिजची घोषणा केली आहे. द रेल्वे मेन (The Railway Men) या वेब सीरिजचे कथानक 1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेवर (Bhopal gas tragedy) आधारित आहे. या भोपाळ (Bhopal) गॅस दुर्घटनेमध्ये अनेक लोकांनी त्यांचा जीव गमावला होता.  


रेल्वे मेन ही वेब सीरिज 2 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन (R. Madhavan) प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबिल देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.  केके मेनन आणि दिव्येंदु देखील या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. वेब सीरिजमध्ये बाबिलचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 






काय घडले होतो भोपाळमध्ये ? 
1984 मध्ये, 2-3 डिसेंबर रोजी  युनियन कार्बाइड कारखान्यात मिथाइल आयसो सायनाइड (MIC)ची गळती झाली होती. हा विषारी वायू हवेत मिसळल्याने तो शहरात दूरवर पसरला होता. या गॅस गळतीमुळे  जवळपास 15,000  लोकांचा मृत्यू झाला.भोपाळमध्ये   तेव्हा 40 टन मिथाइल आयसो सायनाइड गॅसची गळती झाली होती.


संबंधित बातम्या


Swapnil Joshi Movie Bali : 'गूढ रहस्य उलगडायला येणार का ती..? ; बळीचा ट्रेलर रिलीज


TRP Report : बड्या पडद्यावरचे सुपरस्टार छोट्या पडद्यावर फेल! अमिताभ, सलमान, रणवीरचा एकही शो टॉप टेनमध्ये नाही


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha