Swapnil Joshi Movie Bali : अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या मितवा, दुनियादारी, मुंबई-पुणे- मुंबई या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. नुकताच स्वप्नीलने त्याच्या बळी या नव्या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फ्युरिया यांनी केले आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
बळी या हॉरर चित्रपटाची वाट स्वप्नील जोशीचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. या चित्रपटात स्वप्नीलसोबतच अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता समर्थ जाधव यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. 'कोण आहे एलिझाबेथ..?एक गूढ रहस्य उलघडायला येणार का ती..? या साऱ्या प्रश्नांसह घेऊन आलोय 'बळी' चा ट्रेलर आणि पोस्टर' असं कॅप्शन देऊन स्वप्नीलने बळी चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.
अॅमेझॉनवरील 'शेरशाह', 'तूफान', 'कूली नं. १', 'गुलाबो सिताबो', 'शकुंतला देवी', 'शेरनी', 'दुर्गामती', 'छलांग' आणि 'हॅलो चार्ली या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. तसेच अॅमेझॉनवरील वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिजला देखील प्रेक्षक आवडीने पाहतात. 'दि फॅमिली मॅन', 'मिर्झापूर' आणि 'मेड इन हेवन' या वेब अॅमेझॉनवरील वेब सीरिज लोकांच्या पसंतीस पडत आहेत.
संबंधित बातम्या