Aamir Khan Films Re Release : बॉलिवूडचा सुपरस्टार आमीर खानच्या कमबॅकची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. 2022 सालापासून तो मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. याआधी त्याचा लाल सिंह चढ्ढा हा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकलेला नाही. मात्र आता हा अभिनेता तुम्हाला पुढच्या सात दिवसांतच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगामी आठवड्यात आमीर खानचे अनेक चित्रपट री-रिलीज होणार आहेत. यात 750 कोटी रुपये कमवणाऱ्या एका चित्रपटाचाही समावेश आहे.
सलमानच्या सिकंदरसह अनेक नवे चित्रपटही येणार
आमीर खानचे साधारण 12-13 चित्रपट री-रिलीज होणार आहेत. त्यासाठी पीव्हीआर आयनॉक्सने सर्वकाही नियोजन केले आहे. आमीर खानचा 60 वा वाढदिवस संस्मरणीय व्हावा यासाठी हे चित्रपट री-रिलीज होणार आहेत. आगामी काळात सलमान खानचा सिकंदर, द डिप्लोमॅट, मिकी-17, स्नो व्हाईट, द डे द अर्थ ब्लूप, किंग्स्टन यासारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या नव्या चित्रपटांच्या गर्दीत आता आमीर खानचे हे चित्रपट री-रिलीज होणार आहेत.
आमीर खानच्या फॅन्सना मिळणार गिफ्ट
पीव्हीआर आयनॉक्स लमिटेडतर्फे आमीर कानचे हे चित्रपट री-रिलीज केले जाणार आहेत. याबाबत या कंपनीचे अधिकारी संजीव कुमार बालजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या महिला दिनी आम्ही क्वीन, फॅशन, हायवे यासारखे चित्रपट री-रिलीज करणार आहोत तसेच याच महिन्यात लुटेरा, शादी मे जरूर आणा, लम्हे, द कराडे कीड (1984), हाफ गर्लफ्रेंड, कर्ज, घातक हे चित्रपटही नव्याने रिलीज करणार आहोत. आमीर खानच्या चित्रपटांचा तर आमच्याकडे फिल्म फेस्टिव्हल आहे. आम्ही आमीर खानचे 12 ते 13 चित्रपट री-रिलीज करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
कोणकोणते चित्रपट री-रिलीज होणार?
री-रिलीज होणाऱ्या या चित्रपटांत लगान, तारे जमीन पर, रंग दे बसंती, दिल चाहता है, पीके यासारखे प्रसिद्ध आणि सुपरहीट चित्रपटही असतील. यातील काही चित्रपट हे आमीर खानच्या जन्मदिनी री-रिलीज होतील. म्हणजेच आमीर खानचा 60 वा वाढदिवस संस्मरणीय असणार आहे.
हेही वाचा :
बॉलिवूडच्या देसी गर्लने विकले मुंबईतले 4 आलिशान फ्लॅट्स, विक्रीची किंमत वाचून चकित व्हाल!