एक्स्प्लोर

Marathi Serial : 'सावली होईन सुखाची' मालिका घेणार नवीन वळण; गौरी खरंच जिवंत असेल की रुद्राला होतोय गौरीचा भास?

Marathi Serials : 'सावली होईन सुखाची' मालिका नवीन वळण घेणार आहे. गौरी खरंच जिवंत असेल की रुद्राला गौरीचा भास होतोय हे लवकरच कळणार आहे.

Marathi Serials : नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे आणि अचानक आयुष्य कोणत्या वळणावर येऊन अडकणार याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. अशाचप्रकारे एक मोठं संकट 'सावली होईन सुखाची' (Savali Hoin Sukhachi) या मालिकेतील रुद्रा, गौरी आणि बिट्टी यांच्या आयुष्यात आलं आहे.

प्रेक्षकांना कथेच्या मालिकेशी खिळवून ठेवण्यात सन मराठी वाहिनीला नेहमीच यश येतं. 'सावली होईन सुखाची' या मालिकेत आता मोठा ट्विस्ट घडणार आहे. मालिकेची कथा काही महिने पुढे सरकली आहे.

गौरी आणि बिट्टी यांचं नेमकं काय नातं आहे याचा खुलासा झाला असून रुद्राला खरं कळलं आहे की गौरी आणि बिट्टी या नात्याने खऱ्या माय लेकी नाहीत. या कारणास्तव गौरी आणि बिट्टी यांना घरातून काढून टाकले जाते. हे दुःख त्या दोघींनी कसं पचवलं असेल...? या प्रसंगानंतर गौरी आणि बिट्टी यांनी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केल्याची बातमी  रुद्राच्या कानावर येते आणि हे ऐकून रुद्राच्या पायाखालची जमीन सरकते. 

गौरी आणि बिट्टीच्या आत्महत्येमुळे रुद्राच्या मनावर पुन्हा होणार आघात

गौरी आणि बिट्टीच्या मृत्यूची घटना सहन करू न शकलेला आणि अपराधीपणाची भावना घेऊन फिरणारा रुद्रा पुन्हा एकदा दारूच्या/ अति मद्यापानाच्या मार्गाला लागतो. या आघातामुळे तो पुन्हा एकदा व्यवसायातील रस, इच्छा गमावतो आणि दिवाळखोर बनतो. पैशांची वसुली करणारी माणसं त्यांच्या पाठी लागली आहेत, एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमुळे त्याचा त्याच्या आयुष्यावर ताबा राहिलेला नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

रुद्राच्या आयुष्यातील हा टप्पा कोणतं नवं वळण घेणार याकडे प्रेक्षकांचं नक्कीच लक्ष असेल. सध्याची रुद्राची परिस्थिती पाहता त्याचा पूर्ण वेगळा लूक आता पाहायला मिळणार आहे. दारूच्या आहारी गेलेला रूद्रा दारूच्या नशेत सतत गौरी आणि बिट्टीशी बोलत असतो. दोघींच्या आठवणीत हरवून गेलेल्या रूद्राला एके दिवशी एका दुकानातील अगरबत्तीच्या वासाने गौरी जिवंत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.  

खरंच गौरी जिवंत असेल का?

खरंच गौरी जिवंत असेल का? की गौरी सारखं कोणी दुसरं असेल? आणि जर ही आपलीच गौरी असेल तर तिची गौरी म्हणून नवीन अवतारात एन्ट्री होणार की आहे तीच गौरी तिच्या अंदाजात आपल्या समोर येणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले असतील, या प्रश्नांचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहावी लागणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget