Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प' लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडने खरेदी केली नवी गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क


Kartiki Gaikwad New Car : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) फेम कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने नवी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर गाडी विकत घेतानाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी घेतली आहे. अभिनेत्रीने महागडी गाडी खरेदी केली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Serial : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'


Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serials) विश्वात वेगवेगळे प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Mangesh Desai : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट म्हणजे 'धर्मवीर 2'; निर्माते मंगेश देसाई यांची माहिती


Mangesh Desai ON Dharmaveer 2 : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती मंगेश देसाई (Mangesh Desai) यांनी केली आहे. 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि आनंद दिघे (Anand Dighe) या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं मंगेश देसाई म्हणाले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Abhishek Bachchan : 'चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर झणझणीत मिसळ खातानाचा अभिषेक बच्चनचा व्हिडीओ होतोय व्हायरल


Abhishek Bachchan Video Viral : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अनेक वर्षांनी अभिषेकने या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर आगमन केले आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिषेकचे चित्रपट फक्त OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत होते. याआधी अभिषेकचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. घूमरमध्ये अभिषेक बच्चन व्यतिरिक्त सैयामी खेर मुख्य भूमिकेत दिसली आहे. सध्या हे दोघेही प्रमोशन करण्यात मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरता हे दोघेही चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Prajakta Mali : प्राजक्ता माळीचा नवा सिनेमा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'तीन अडकून सीताराम'


Prajakta Mali New Marathi Movie Teen Adkun Sitaram : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आगामी  सिनेमाचं नाव 'तीन अडकून सीताराम' (Teen Adkun Sitaram) असं आहे. आगामी सिनेमाची घोषणा करत सिनेमाचं नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.  


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा