Kartiki Gaikwad New Car : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa Little Champs) फेम कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने नवी गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर गाडी विकत घेतानाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी घेतली आहे. अभिनेत्रीने महागडी गाडी खरेदी केली आहे. 


कार्तिकी गायकवाडने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली माहिती


लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाडने गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'घरातील नवीन सदस्य' असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. सेलिब्रिटींसह चाहते कमेंट्स करत गायिकेला शुभेच्छा देत आहेत. अभिनंदन, याचसाठी केला होता अट्टाहास, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


कार्तिकी गायकवाड सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता तिच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबियांसोबत दिसत आहे. कार्तिकीचा पती रोनित, आई-वडील, भावंड यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. गायकवाड कुटुंबियांनी गाडी घेतल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा भाऊ गाडीची पूजा करताना दिसत आहे.






कार्तिकी गायकवाडच्या वडिलांचा आज वाढदिवस आहे. वडिलांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केली आहे. तसेच गायिकेने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त हातावर 'डॅडी' लिहिलेला खास टॅटूही काढला आहे. या टॅटूने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. माझा पहिला टॅटू वडिलांना समर्पित असं म्हणत तिने टॅटू काढला आहे. 


कार्तिकी गायकवाडने खरेदी केलेल्या गाडीची किंमत काय आहे? (Kartiki Gaikwad New Car Price)


कार्तिकीने 'फॉर्च्युनर' (Fortuner) ही गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत 30 ते 35 लाखांच्या आसपास आहे. अभिनेत्रीने गाडी घेतल्याचा व्हिडीओ शेअर करत 'घरातील नवीन सदस्य फॉर्च्युनर' असं कॅप्शन दिलं आहे. कार्तिकीची नवी गाडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 


'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. आजही तिच्या आवाजाचा मोठा चाहतावर्ग आहे.  'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स'मध्ये कार्तिकीने गायलेली गाणी आजही चाहते विसरलेले नाहीत. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. गाण्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे कार्तिकी अनेकदा चर्चेत असते. 


संबंधित बातम्या


Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प' लिटील चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडची पती रोनितसोबत बाली सफर; पाहा फोटो