Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Marathi Drama : अन् मराठी नाट्यसृष्टी बहरली! ऑगस्टमध्ये नाट्यरसिकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Upcoming Marathi Drama : मराठी मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत. एकीकडे वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे मराठी सिनेमे (Marathi Movies) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. बॉक्स ऑफिसवर (Box Office) हे सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान नवीकोरी नाटकंदेखील (Upcoming Marathi Drama) प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 'जर तरची गोष्ट', 'ब्रँड अॅम्बॅसेडर', 'किरकोळ नवरे', 'चाणक्य', 'मी नथुराम गोडसे बोलतोय' ही नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पण आता या कार्यक्रमात ओंकार भोजनेला परत आणा, अशी मागणी चाहते करत आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Baipan Bhaari Deva : ब्लॉकबस्टर 'बाईपण भारी देवा'! 31 दिवसांत पार केला 70 कोटींचा टप्पा
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. देशासह जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच गल्ला जमवत आहे. 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आता 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' महाराष्ट्राची नंबर वन मालिका
Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेच्या कथानकात ट्विस्ट आणत आहेत. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'रंग माझा वेगळा' या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत.