Marathi Serial : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेच्या कथानकात ट्विस्ट आणत आहेत. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 


2. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.


3. टीआरपी लिस्टमध्ये 'रंग माझा वेगळा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.


5. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.


6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.1 रेटिंग मिळाले आहे.  


7. टीआरपीच्या शर्यतीत 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.9 रेटिंग मिळाले आहे. 


8. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.9 रेटिंग मिळाले आहे. 


9. नव्या स्थानावर 'अबोली' ही मालिका आहे. या मालिकेला 4.0 रेटिंग मिळाले आहे. 


10. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.8 रेटिंग मिळाले आहे. 


'ठरलं तर मग' मालिकेने नंबर वनचं बिरुद राखलं कायम


'ठरलं तर मग' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही मालिका दर आठवड्याला टीआरपीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. या आठवड्यात 6.9 हा सर्वोच्च टीआरपी मिळवत 'ठरलं तर मग' मालिकेने नंबर वनचं बिरुद कायम राखलं आहे. महाराष्ट्राच्या या नंबर वन मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. मालिकेतील अर्जुन आणि सायलीमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. विशेष म्हणजे आदेश, सुचित्रा आणि सोहम बांदेकर या मालिकेचे निर्माते आहेत. या मालिकेच्या महाएपिसोडलाही 5.9 रेटिंग मिळाले आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चाहते म्हणाले,"ओंकार भोजनेला परत आणा"