Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पण आता या कार्यक्रमात ओंकार भोजनेला परत आणा, अशी मागणी चाहते करत आहेत. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कधी सुरू होणार? (Maharashtrachi Hasyajatra Coming Soon)


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra Promo Out) या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये दत्तु मोरे, ईशा डे, शिवाली परब, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले आणि वनीता खरात दिसत आहेत. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर आहेत तयार. 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत'तुमचं स्वागत... पाहा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा-सहकुटुंब हसू या' 14 ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर". 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचं नवं पर्व 14 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीम अमेरिका दौऱ्यावर


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेची टीम सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांना या मालिकेच्या टीमने खळखळून हसवलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या टीमचे अमेरिका दौऱ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या टीमचा 23 दिवस अमेरिका दौरा होता. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम येत्या 14 ऑगस्टपासून सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाची जागा आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घेणार असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाच्या चाहत्यांना आता आणखी 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.


"ओंकार भोजनेला परत आणा"; चाहत्यांची मागणी


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने चाहते उत्सुक आहेत. पण त्यांनी ओंकार भोजने आणि विशाखा सुभेदार यांना कार्यक्रमात परत आणा अशी थेट मागणी केली आहे. आता कार्यक्रमाची प्रतीक्षा, हा कार्यक्रम सकारात्मकता आणि चेहऱ्यावर हसू आणतो, देवा ऐकलंस रे बाबा, MHJ परत आलं', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Maharashtrachi Hasyajatra: 'त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली'; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शिनी इंदलकरची खास पोस्ट