Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरने घेतलं नवं घर; फोटो शेअर करत म्हणाला,"एक स्वप्न पूर्ण"


Prasad Khandekar New Home : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विनोदवीर प्रसाद खांडेकरने नवीन घर घेतलं आहे. प्रसाद खांडेकरने गृहप्रवेशादरम्यानचे फोटो एक छान पोस्ट लिहित सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रसादने लिहिलं आहे,"नवीन घर, अजून एक स्वप्न पूर्ण झालं. घर शोधायला लागलं 1 वर्ष, घर बांधायला गेले सहा महिने, घर सजवायला दोन महिने, फायनली नवीन घरात शिफ्ट झालो".


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Hardeek Joshi : हार्दिक जोशीसाठी यंदाचा गणेशोत्सव असणार स्पेशल; म्हणाला,"अक्षयाच्या पद्धतीने..."


Hardeek Joshi On Kalavantancha Ganesh : 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेला राणादा अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि बाप्पाचं नातं खूप खास आहे. तसेच यंदाचा गणेशोत्सव लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव असल्यामुळे तोही खास असणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Riteish Deshmukh Genelia : रितेश-जिनिलिया तिसऱ्यांदा आई-बाबा होणार? 'त्या' व्हिडीओमुळे रंगली चर्चा


Riteish Deshmukh Genelia Deshmukh Pregnancy : बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारी लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी अर्थात रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) सध्या चर्चेत आहेत. रितेश-जिनिलियाचा मुंबईतील एका इव्हेंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर देशमुखांची सून अर्थात जिनिलिया (Genelia Deshmukh Pregnancy) तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Radha Sagar : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज


Radha Sagar Baby Boy : अभिनेत्री राधा सागरला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. राधाने आता सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याची गूडन्यूज दिली आहे. अभिनेत्रीने चिमुकल्याच्या हाताची झलक चाहत्यांना दाखवली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Subhedar: सुभेदार चित्रपट पाहिल्यानंतर समीर वानखेडे यांनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, 'खरे हिरो...'


Subhedar :   'सुभेदार' (Subhedar)  हा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. आता  समीर वानखेडे  (Sameer Wankhede)  यांनी देखील नुकतीच एक खास पोस्ट शेअर करुन सुभेदार चित्रपटाचं कौतुक केलं. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा