Prasad Khandekar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरने घेतलं नवं घर; फोटो शेअर करत म्हणाला,'एक स्वप्न पूर्ण'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम विनोदवीर प्रसाद खांडेकरने नवीन घर घेतलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रसाद खांडेकरने नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

प्रसाद खांडेकरने गृहप्रवेशादरम्यानचे फोटो एक छान पोस्ट लिहित सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रसादने लिहिलं आहे,नवीन घर, अजून एक स्वप्न पूर्ण झालं. घर शोधायला लागलं 1 वर्ष, घर बांधायला गेले सहा महिने, घर सजवायला दोन महिने, फायनली नवीन घरात शिफ्ट झालो.
प्रसादने पुढे लिहिलं आहे,जुन्या दोन्हीही घरांनी भरभरुन दिलं. त्या दोन्ही वास्तूंचे आभार..मोरया.
प्रसादच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या विनोदविराला अर्थात प्रसादला पुढील आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.
प्रसाद खांडेकरने आजवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसाद खांडेकर प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे.
प्रसादच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.