Radha Sagar : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री राधा सागरने (Radha Sagar) एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराधाने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेंसी फोटोशूट करत चाहत्यांना गूडन्यूज दिली होती.
राधाने आता सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्याची गूडन्यूज दिली आहे.
अभिनेत्रीने चिमुकल्याच्या हाताची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
राधा सागरच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
राधाने गूडन्यूज देत लिहिलं आहे,आणि आयुष्यातील सर्वोत्तम क्षण...आम्हाला मुलगा झाला.
राधाने पुढे लिहिलं आहे,तो आल्यावर त्याने त्याची जादू दाखवायला सुरुवात केलीये, असा जादुई मुलगा आहे तो.. जीवनाच्या या नवीन मालिकेत आम्हाला आई आणि वडील म्हणून कास्ट केल्याबद्दल धन्यवाद.
राधा सागरच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'आई कुठे काय करते', 'सुंदरा मनामध्ये भरली' अशा लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून राधा सागर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
राधा सागरच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.