Riteish Deshmukh Genelia Deshmukh Pregnancy : बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारी लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी अर्थात रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) सध्या चर्चेत आहेत. रितेश-जिनिलियाचा मुंबईतील एका इव्हेंटमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओनंतर देशमुखांची सून अर्थात जिनिलिया (Genelia Deshmukh Pregnancy) तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे.


रितेश-जिनिलिया देशमुख नुकतेच मुंबईत एका इव्हेंटमध्ये स्पॉट झाले आहेत. या इव्हेंटमधील त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि जिनिलिया तिसऱ्यांदा आई होणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचे बेबी बंप दिसत असल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. 


रितेश-जिनिलियाचा व्हिडीओ व्हायरल (Riteish Deshmukh Genelia Deshmukh Video Viral)


रितेश-जिनिलियाचा व्हायरल व्हिडीओ हा मुंबईतील एका फॅशन स्टोअरच्या लॉन्चिंगदरम्यानचा आहे. एकमेकांच्या हातात हात पकडून त्यांनी या कार्यक्रम सोहळ्यात एन्ट्री घेतली. दरम्यान पापाराझींसमोर त्यांनी छान रोमँटिक पोझदेखील दिल्या. या कार्यक्रमासाठी जिनिलियाने जांभळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. तर अभिनेत्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि आकाशी रंगाची पॅन्ट परिधान केली होती.  त्यांच्या या लूकपेक्षा जिनिलियाच्या एका कृतीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमुळे जिनिलिया तिच्या पोटावर हात ठेवताना दिसत असून बेबी बंपही दिसत आहे. त्यामुळे आता अभिनेत्री पुन्हा आई होणार असल्याची चर्चा रंगली आहे.






रितेश-जिनिलियाचा व्हिडीओ विरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर ती प्रेग्नंट आहे का? जिनिलिया पुन्हा आई होणार? जिनिलिया गुडन्यूज देणार आहे का? देशमुखांची सून तिसऱ्यांदा आई होणार? असे प्रश्न चाहत्यांनी विचारले आहेत. रितेश-जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


रितेश देशमुख आणि जिनिलिया 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. 'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 10 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर 2 फेब्रुवारी 2012 मध्ये ते लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोन वर्षांनी 24 नोव्हेंबर 2014 रोजी जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 1 जुन 2016 रोजी त्यांनी राहीलचं स्वागत केलं. 


 


संबंधित बातम्या


Riteish Deshmukh : India Vs Bharat दरम्यान रितेश देशमुखने घेतला पोल; चाहत्यांचा कौल कोणाला? जाणून घ्या...