Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Naal 2 Teaser: नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2' चा टीझर पाहिल्यानंतर जितेंद्र जोशी म्हणाला, "बोल गं बाई त्याच्याशी..."; पोस्टनं वेधलं लक्ष


Naal 2 Teaser:  नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) यांचा नाळ-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आई आणि मुलाचं नातं रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नाळ-2 या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर या चित्रपटामधील 'भिंगोरी' हे गाणं देखील रिलीज करण्यात आलं. आता नाळ-2 या चित्रपटाचा आणखी एक नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर अभिनेता जितेंद्र जोशीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Gautami Deshpande: "तुझ्याकडे गाडी नाहीये का? सारखं रिक्षातून फिरत असतेस. तुझी बहीण बघ..", नेटकऱ्याचा प्रश्न; गौतमी देशपांडेनं दिलं भन्नाट उत्तर


Gautami Deshpande : मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande )  आणि तिची बहीण अभिनेत्री गौतमी देशपांडे  (Gautami Deshpande) या दोघीही सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. गौतमी आणि मृण्मयी या बहिणींच्या जोडीचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकतेच गौतमीनं  इन्स्टाग्रामवर "कॅन यू गेस" हे सेशन केले. या सेशनमध्ये एका नेटकऱ्यानं गौतमीला एक प्रश्न विचारला. या प्रश्नाला गौतमीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Malaika Arora: नटून थटून पुरस्कार सोहळ्याला पोहोचली मलायका; श्रेया बुगडेला पाहिल्यानंतर म्हणाली...


Malaika Arora: अभिनेत्री मलायका आरोरा (Malaika Arora) ही तिच्या फिटनेसमुळे आणि ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चात असते. मलायकाला अनेक वेळा तिच्या फॅशनमुळे ट्रोल केलं जातं. नुकतीच मलायकानं एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील मलायकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Gautami Patil: "माझा कारभार सोपा नसतोय रं" नंतर आता "दिलाचं पाखरू "; गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची होतीये चर्चा!


Gautami Patil :  गौतमी पाटील (Gautami Patil)  ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकते. गौतमीच्या अदा आणि तिचा डान्स हा प्रेक्षकांना घायाळ करतो. सध्या गौतमी ही तिच्या एका नव्या गाण्यामुळे चर्चेत आहे. गौतमीचं "दिलाचं पाखरू" हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. "दिलाचं पाखरू" या गाण्यात गौतमीचा रोमँटिक अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळत आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi movie On Ott: वीकेंडला ओटीटीवर घरबसल्या पाहा हे मराठी चित्रपट