Marathi movie On Ott: वीकेंडला ओटीटीवर घरबसल्या पाहा हे मराठी चित्रपट
ओटीटीवर (OTT) घरबसल्या चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्यास अनेकांना आवडते. अनेक लोक ओटीटीवरील वेब सीरिज बिंच वॉच करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते.
जाणून घेऊयात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मराठी चित्रपटांबद्दल...
'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात सुबोध भावेनं काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
पोस्टर गर्ल या 2016 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. हा चित्रपट जरी विनोदी असला तरी खूप गंभीर विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. हा चित्रपट देखील तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट देखील तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या चित्रपटात सागर देशमुखनं प्रमुख भूमिका साकारली आहे.
भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध हा चित्रपट देखील प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
ठाकरे हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीनं प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट प्रेक्षक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.