Naal 2 Teaser:  नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) यांचा नाळ-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा आई आणि मुलाचं नातं रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. नाळ-2 या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. त्यानंतर या चित्रपटामधील 'भिंगोरी' हे गाणं देखील रिलीज करण्यात आलं. आता नाळ-2 या चित्रपटाचा आणखी एक नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर अभिनेता जितेंद्र जोशीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.


नाळ-2 चा टीझर रिलीज


नाळ-2 या चित्रपटाच्या या नव्या टीझरमध्ये चैत्या आणि त्याची आई दिसत आहेत. टीझरच्या सुरुवातीला दिसते की, चैत्या हा त्याच्या आईला छत्री आणून देतो. त्यानंतर टीझरमध्ये चैत्या हा आईला सायकवर घेऊन जाताना दिसत आहे.


जितेंद्र जोशीची पोस्ट


नाळ-2 चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर जितेंद्र जोशीनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, "पहिल्या भागात ती चैतूसोबत बोललीच नाही त्यामुळं मला लई राग आला होता तिचा. चैतु पहात राहिला आणि मी रडत. आता मोठा झालाच आहे तर बोल गं बाई त्याच्याशी.. खूप खूप शुभेच्छा मित्रांनो.. पहिल्या भागाच्या आठवणींचा खजिना मोठा चैत्या पुन्हा उलगडणार, येत्या दिवाळीत नात्यांची नाळ अजून घट्ट होणार!"


पाहा टीझर:






नाळ-2 ची रिलीज डेट

'नाळ - भाग 2' हा चित्रपट 10 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  'नाळ' (Naal) हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता.  सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाची प्रेक्षकांशी 'नाळ' जोडली गेली.  आता  'नाळ भाग 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 


संबंधित बातम्या:


Nagraj Manjule Naal 2 : 'जाऊ दे ना वं'च्या यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलं 'भिंगोरी'; नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2'ची प्रेक्षकांना उत्सुकता