Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Maharashtrachi Hasyajatra : आता वीकेंड होणार हसरा... शनिवार आणि रविवार घराघरांत भरणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'!


Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता वीकेंड हसरा होणार आहे. शनिवार आणि रविवार घराघरांत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' भरणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Serials TRP : 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर; जुई गडकरी गाजवतेय छोटा पडदा


Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने पहिल्याच आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sindhutai Mazi Mai : चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय; ‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’


Sindhutai Mazi Mai : 'सिंधुताई माझी माई’ (Sindhutai Mazi Mai) या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Hardeek Joshi : राणादा म्हणतोय,"खेळातला माणूस बदलला की खेळाची पद्धतही बदलते"; नेमकं प्रकरण काय?


Hardeek Joshi Movie Club 52 : अभिनेता हार्दिक जोशीला (Hardeek Joshi) यंदा त्याच्या वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. हार्दिकची प्रमुख भूमिका असलेल्या 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाचं टायटल  पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  लाँच करण्यात आले होते . आता 'क्लब 52' या सिनेमातील हार्दिकचा लूक हा सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


सायली संजीव स्टारर मराठी चित्रपट "काया" चे टीझर पोस्टर लाँच


महिला केंद्रीत चित्रपट आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून मराठी चित्रपटसृष्टीत हा एक मोठा बदल होताना दिसत आहे, या चित्रपटाने अभिनेत्री सायली संजीव मुख्य भूमिकेत असलेल्या "काया" या चित्रपटाची घोषणा मुंबईत टीझर पोस्टर लाँच करताना करण्यात आली. मराठी जगतातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे अनाऊंसमेंट पोस्टर आणि टीझर पोस्टर मुंबईत लाँच करण्यात आले. यावेळी अभिनेत्री सायली संजीव, माधुरी पवार, सचिन बांगर, अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यासह निर्माता अक्षय येताळे, दिग्दर्शक तुषार झगडे, संगीतकार अमित राज उपस्थित होते.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा