Nushrratt Bharuccha Israel Hamas Attack : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्त्रायलमधील (Israel) युद्धात अडकली असल्याचं समोर आलं असून आता अभिनेत्रीसंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. इस्त्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत संपर्क होत नसल्याचं समोर आलं होतं. आता दूतावासाला इस्त्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतचा शोध लागला असून ती सुखरूप असल्याचं समोर आलं आहे. तसेच लवकरच ती मायदेशी भारतात परतणार आहे.


इस्त्रायलमध्ये अडकलेली नुसरत सुखरूप


इस्त्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतचा संपर्क होत नसल्याने चाहते चिंता व्यक्त करत होते. पण आता नुसरतसोबत संपर्क झाल्याने तसेच ती सुखरूप असल्याचं समोर आल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.






नुसरतच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार,"नुसरतसोबत संपर्क साधण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. दूतावासाच्या मदतीने तिला सुरक्षितपणे मायदेशी भारतात आणले जाणार आहे. कनेक्टिंग फ्लाइटने ती भारतात येणार आहे. अभिनेत्रीच्या सुरक्षेसाठी अधिक माहिती शेअर करू शकत नाही. ती सुरक्षित असून लवकरच भारतात येणार असल्याने देवाचे आभार".  


हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नुसरत इस्त्रायलला गेली होती. आता ती यशस्वीरित्या विमानतळावर पोहोचली असून सुरक्षित आहे. हमासच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये (Israel-Palestine Escalation) युद्ध सुरू आहे.






नुसरत भरूचाच्या सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Nushrat Bharucha Movies)


नुसरत भरूचा बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री (Bollywood Actress) आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून नुसरतने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. प्यार का पंचनामा, ड्रीम गर्ल, जनहित में जारी, राम सेतु अशा अनेक सिनेमांत नुसरतच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा 'अकेली' (Akeli) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Nushrratt Bharuccha : इस्रायलमधील युद्धाच्या भडक्यात अडकली नुसरत भरुचा; अभिनेत्रीसोबत संपर्क होत नसल्याची टीमची माहिती