Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आता वीकेंड हसरा होणार आहे. शनिवार आणि रविवार घराघरांत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' भरणार आहे.


संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा सहकुटुंब हसू या म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि या जत्रेतून भेटणारी कोहली फॅमिली.. लॉली.. सावत्या.. गौऱ्या आणि असे बरेच प्रतिभावंत कल्लाकार आज आपल्याही घरातील एक सदस्यच झाले आहेत. या साऱ्या अजबगजब पात्रांची आपल्याला इतकी सवय झालेली आहे ना की, एक जरी भाग चुकला तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. 




'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कधी पाहायला मिळेल? (Maharashtrachi Hasyajatra Show Time)


आदल्या आठवड्याचं टेन्शन विसरून येणाऱ्या आठवड्याची सुरूवात जर आनंदाने अगदी प्रसन्न करायची असेल तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पाहण्यासाठी टीव्हीसमोर बसूया आणि सहकुटुंब हसूया हा एकमेव उपाय आपल्या हाती आहे. हीच बाब हेरून आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' 7 ऑक्टोबरपासून दर शनि. आणि रवि. रात्री 9.00 वा. आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहे.  


वीकेंड हसरा करण्यासाठी जत्रेकरी सज्ज!


आठवड्याभराच्या तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' वीकेंडला म्हणजेच दर शनिवारी आणि रविवारी आपल्या भेटीस येणार आहे.'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी आणि उत्सुकतेची गोष्ट असून या जत्रेतील मंडळी आता प्रेक्षकांचा वीकेंड हसरा करण्यासाठी सज्ज आहेत. 


"ओंकार भोजनेला परत आणा"; चाहत्यांची मागणी


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने चाहते उत्सुक आहेत. पण त्यांनी ओंकार भोजने आणि विशाखा सुभेदार यांना कार्यक्रमात परत आणा अशी थेट मागणी केली आहे. आता कार्यक्रमाची प्रतीक्षा, हा कार्यक्रम सकारात्मकता आणि चेहऱ्यावर हसू आणतो, देवा ऐकलंस रे बाबा, MHJ परत आलं', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; चाहते म्हणाले,"ओंकार भोजनेला परत आणा"