Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Arun Kadam : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अरुण कदम झाले आजोबा; लाडक्या दादूसची लेक सुकन्याने दिला गोंडस बाळाला जन्म


Arun Kadam Daughter News : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम अरुण कदम (Arun Kadam) सध्या चर्चेत आहेत. विनोदवीर अरुण कदम यांच्या घरी तान्हुल्याचे आगमन झाले आहे. लाडका दादूस अर्थात अरुण कदम यांची लेक सुकन्याने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे दादूसचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Jitendra Joshi : 'निर्लज्जपणा किंवा बेफिकिरी...'; जितेंद्र जोशीच्या पोस्टनं वेधलं लक्ष


Jitendra Joshi : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. जितेंद्र जोशींच्या कवितांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. जितेंद्र  हा कधी विविध कार्यक्रमांमध्ये तर कधी सोशल मीडियावर कविता सादर करत असतो. नुकतीच जितेंद्रनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं कविता आणि रिल हा विषय मांडला आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Pooja Sawant : पूजा सावंतच्या 'दगडी 2' सिनेमाला एक वर्ष पूर्ण; अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली,"कलरफुल नेहमीच तुमच्या मनात कायम जिवंत राहील"


Pooja Sawant Daagadi Chawl 2 Movie : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 'दगडी चाळ' (Daagadi Chawl) या सिनेमात अभिनेत्रीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर 'कलरफुल' म्हणून ती ओळखली जाऊ लागली. 'दगडी चाळ'नंतर प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गेल्या वर्षी 'दगडी चाळ 2' (Daagadi Chawl 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या सिनेमाच्या वर्षपुर्तीनिमित्ताने अभिनेत्रीने खास पोस्ट लिहिली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Mangesh Desai : 'कुटुंबातील सदस्यांचे आडनाव देशपांडे पण माझं देसाई कारण...'; मंगेश देसाई यांनी सांगितला किस्सा


Mangesh Desai: अभिनेते मंगेश देसाई (Mangesh Desai) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अनेक चित्रपटांमध्ये मंगेश यांनी काम केले आहे. मंगेश देसाई यांनी निर्मिती केलेला धर्मवीर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मंगेश यांनी नुकतीच सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar ) यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मंगेश यांनी त्यांच्या आडनावाबद्दल सांगितलं.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' च्या टीमनं 'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये लावली हजेरी; केदार शिंदे म्हणतात,'मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर जावून...'


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन  केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केले आहे.  'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या टीमनं  इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या कलाकारांनी डान्स देखील केला. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा