Jitendra Joshi: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. जितेंद्र जोशींच्या कवितांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. जितेंद्र  हा कधी विविध कार्यक्रमांमध्ये तर कधी सोशल मीडियावर कविता सादर करत असतो. नुकतीच जितेंद्रनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं कविता आणि रिल हा विषय मांडला आहे.


जितेंद्र जोशीची पोस्ट


जितेंद्र जोशीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, “एखाद्याच्या आवाजातील त्याचीच कविता स्वत:चा रिल बनवण्यासाठी वापरताना त्या माणसाच्या नावाचा उल्लेख सुद्धा करु नये हे वाटण्याचा निर्लज्जपणा किंवा बेफिकिरी मधून येणारा उद्दामपणा कुठून येत असावा?” जितेंद्रनं या पोस्टमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे आता त्यानं ही पोस्ट कोणासाठी केली आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.




जितेंद्र जोशीचे चित्रपट


पोश्टर गर्ल, व्हेंटिलेटर, बाजी, दुनियादारी यांसारख्या चित्रपटांमध्ये जितेंद्रनं काम केलं. तसेच सिंघम रिटर्न्स, द अटॅक्स ऑफ 26/11 या हिंदी चित्रपटांमध्ये देखील जितेंद्रनं महत्वाच्या भूमिका साकारल्या.  सॅक्रेड गेम्स, बेताल, ब्लडी ब्रदर्स, स्कूल ऑफ लाइज या वेब सीरिजमधील जितेंद्रच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच जितेंद्रनं नाटकांमध्ये देखील काम केलं आहे. जितेंद्रच्या आगामी वेब सीरिज, नाटक आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. जितेंद्र हा सोशल मीडियावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. त्याला इन्स्टाग्रामवर 187K फॉलोवर्स आहेत. 






जितेंद्रचा गोदावरी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  या चित्रपटात जितेंद्र जोशीसोबतच नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय - इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात 'गोदावरी'ने आपली मोहोर उमटवली आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


Shreyas Talpade: 'आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊन प्रार्थना केली...'; जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक