Pooja Sawant Daagadi Chawl 2 Movie : मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 'दगडी चाळ' (Daagadi Chawl) या सिनेमात अभिनेत्रीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर 'कलरफुल' म्हणून ती ओळखली जाऊ लागली. 'दगडी चाळ'नंतर प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर गेल्या वर्षी 'दगडी चाळ 2' (Daagadi Chawl 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या सिनेमाच्या वर्षपुर्तीनिमित्ताने अभिनेत्रीने खास पोस्ट लिहिली आहे. 


पूजा सावंतच्या 'दगडी चाळ 2' सिनेमाची वर्षपुर्ती!


'दगडी चाळ 2' या सिनेमाच्या वर्षपुर्ती निमित्ताने पूजा सावंतने खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे,"दगडी चाळ 2' वर्षपुर्ती... माझ्या या टिमबद्दल बोलावे तितके कमीच आहे. खरंतर टिम नाही...एक गोड कुटुंबच म्हणेन मी...आम्हा सर्वांना नेहमीच योग्य आणि खरा मार्ग दाखवल्याबद्दल, एक अभिनेत्री म्हणून मला घडवल्याबद्दल, सतत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल, खरंच मनापासून आभार...". 






पूजा सावंत पुढे म्हणतेय,"कलरफुलचा सिनेमातला प्रवास जरी संपला असला तरी तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे कलरफुल नेहमीच तुमच्या मनात कायमची जिवंत राहील". पूजा सावंतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. खूप खूप प्रेम पूजा सावंत, खूप सुंदर काम, कलरफुलला कधीही विसरू शकत नाही, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


'दगडी चाळ 2' मध्ये प्रेक्षकांना सूर्या आणि सोनलचा मुलगाही पाहायला मिळाला. चंद्रकांत कणसे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. 'दगडी चाळ'प्रमाणे 'दगडी चाळ 2' हा सिनेमाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. 


पूजा सावंतबद्दल जाणून घ्या... (Who is Pooja Sawant)


पूजा सावंत मराठमोळी अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'लपाछपी' सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला. पूजा सावंतचा 'दगडी चाळ 2' या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात पूजाने साकारलेली कलरफुल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 


संबंधित बातम्या


Daagdi Chawl 2 Movie Review : खिळवून ठेवणारा क्राईम थ्रीलर