Mangesh Desai: अभिनेते मंगेश देसाई (Mangesh Desai) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अनेक चित्रपटांमध्ये मंगेश यांनी काम केले आहे. मंगेश देसाई यांनी निर्मिती केलेला धर्मवीर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मंगेश यांनी नुकतीच सुलेखा तळवलकर (Sulekha Talwalkar ) यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मंगेश यांनी त्यांच्या आडनावाबद्दल सांगितलं.


सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंगेश देसाई यांनी त्यांच्या बालपणाच्या आठवणी सांगितल्या. तसेच मंगेश यांनी त्यांच्या आडनावाबद्दल देखील सांगितलं.  मंगेश देसाई यांनी सांगितलं, "मी देसाई आडनाव लावतो. पण माझ्या कुटुंबातील इतर सर्व सदस्य देशपांडे आडनाव  लावतात. जेव्हा माझं शाळेत अॅडमिशन करायचं होतं तेव्हा माझ्या वडिलांनी मला देसाई, देशमाने आणि अजून एक दोन पर्याय देऊन विचारलं की, यापैकी कोणतं आडनाव तुला आवडलं? मी त्यांना सांगितलं की, मला देसाई हे आडनाव आवडलं. मग त्यांनी माझं आडनाव देसाई ठेवलं."


"मला नंतर कळालं की, देसाई ही आमची गावाकडची पदवी आहे, ती वंशात कोणीतरी वापरायची असते म्हणून मला ते आडनाव दिलं. मी देसाई आहे बाकी सगळे देशपांडे आहेत आणि माझ्या मुलाचं आडनाव देखील देसाई आहे." असंही मंगेश यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.


 मंगेश देसाई  यांच्या धर्मवीर-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट म्हणजे 'धर्मवीर 2' या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे, असं  मंगेश देसाई यांनी  एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं.


तसेच मंगेश देसाई यांचा अंकुश हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मंगेश देसाई यांनी साजन भाई ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 






मंगेश देसाई यांनी एक अलबेला या चित्रपटामध्ये अभिनेत्री विद्या बालनसोबत काम केलं आहे. बायोस्कोप, हुप्पा हुय्या या चित्रपटांमधील मंगेश यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  


संबंधित बातम्या


Mangesh Desai : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट म्हणजे 'धर्मवीर 2'; निर्माते मंगेश देसाई यांची माहिती