Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Jhimma 2 : 'त्या' सात जणी पुन्हा आल्या अन् गाजवलं बॉक्स ऑफिस! 'झिम्मा 2'ने सात दिवसांत कमावले 'इतके' कोटी


Jhimma 2 Box Office Collection Day 7 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा मराठी सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. 'झिम्मा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर ते 'झिम्मा 2'ची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Serials : जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग'मालिकेची TRP मध्ये जबरदस्त कामगिरी; अरुंधतीसाठी ठरणार धोक्याची घंटा?


Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील प्रथमच रुपेरी पडद्यावर! 'घुंगरु'चं पहिलं पोस्टर आऊट


Gautami Patil : महाराष्ट्राला आपल्या नृत्याने वेड लावणारी सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे. गौतमीच्या आगामी 'घुंगरु' (Ghungroo) या सिनेमाचं पहिलं पोस्टर आता आऊट झालं आहे. गौतमीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'घुंगरु'चा ट्रेलर आऊट! 100 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सिनेमा


Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या तिच्या आगामी 'घुंगरु' (Ghungroo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार असून आता या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 100 चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Neha Pendse : दोनदा घटस्फोट घेतलेल्या व्यक्तीसोबत लग्न केल्याने झाली ट्रोल, मग उत्तर देताना म्हणाली, 'मी कुठे व्हर्जिन आहे'


Neha Pendse : नेहा पेंडसे ही आपल्या अभिनयासोबत सौंदर्याबद्दल प्रसिद्ध आहे. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 'भाबीजी घर पर है' या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दिसलेली नेहा पेंडसेने वयाच्या 36 व्या वर्षी लग्न केले. बिझनेसमन शार्दुल सिंह ब्यास यांनी नेहाशी लग्न करण्यापूर्वी दोनदा लग्न केले होते.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा