Boney Kapoor On Sridevi Biopic : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचं आयुष्य एखाद्या सिनेमाप्रमाणे आहे. आयुष्यातले 50 वर्ष त्यांनी कॅमेऱ्यासमोर काम केलं आहे. श्रीदेवी यांच्या निधनाला अनेक वर्षे झाली असली तरी चाहत्यांमध्ये अजूनही त्यांची चांगलीच क्रेझ आहे. बॉलिवूडची पहिला महिला सुपरस्टार असणाऱ्या श्रीदेवी यांनी तब्बल पाच दशके प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आजही त्यांचे सिनेमे पाहायला प्रेक्षकांना आवडतात. श्रीदेवी यांच्या आयुष्यावर सिनेमा (Sridevi Biopic) बनवण्याची अनेकांची इच्छा आहे. पण बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी मात्र श्रीदेवींच्या बायोपिकसाठी नकार दिला आहे.


श्रीदेवीचा बायोपिक येणार नाही : बोनी कपूर


बोनी कपूर नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाले,"श्रीच्या आयुष्यावर मी कधीही सिनेमा बनवणार नाही. श्रीदेवीच्या बायोपिकसाठी मला अनेकांनी विचारलं आहे. पण आयुष्यात कधीच मी श्रीच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार नाही. श्रीदेवीवर सिनेमा बनवणं हा माझा वैयक्तिक विषय विषय आहे. श्रीदेवीच्या आयुष्यावर किंवा तिच्याबद्दल काही जण पुस्तक लिहित आहेत. तिच्या आयुष्यावर एखादं पुस्तक लिहिण्याचीदेखील माझी इच्छा नाही".






बोनी कपूर पुढे म्हणाले,"श्रीदेवी आणि माझी लव्हस्टोरी ही आमची वैयक्तिक बाब आहे. श्री ही कायमच माझ्या जवळ असणार आहे. आम्ही कसे एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि संसार थाटला ही आमची वैयक्तिक बाब आहे. यावर एखादी कलाकृती होऊ नये". बोनी कपूर यांच्या या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले आहेत.


श्रीदेवी यांनी दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'हिम्मतवाला' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. श्रीदेवी यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. तसेच त्या पहिला महिला सुपरस्टारदेखील होत्या. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचे निधन झाले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना दोन मुली आहेत. त्यांचे नाव जान्हवी आणि खुशी कपूर आहे. श्रीदेवी यांनी 'सोलहवा सावना','हिम्मतवाला','मवाली','तोहवा','नगीना', 'घर संसार','आखिरी रास्ता','कर्मा','मि.इंडिया' यासह अनेक सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांतही अभिनेत्रीने काम केलं. भारतसरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. 'जूली' या सिनेमाच्या 1975 मध्ये श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'हिम्मतवाले' या सिनेमाने श्रीदेवी यांना सुपरस्टार अभिनेत्री बनवलं.


संबंधित बातम्या


Sridevi : श्रीदेवी लग्नाआधी होत्या प्रेग्नंट? 26 वर्षांनी बोनी कपूर यांचा खुलासा