Jhimma 2 Box Office Collection Day 7 : 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा मराठी सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली आहे. 'झिम्मा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर ते 'झिम्मा 2'ची प्रतीक्षा करत होते. अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


'झिम्मा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Jhimma 2 Box Office Collection)


'झिम्मा 2' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 0.90 कोटींची दणदणीत कमाई केली. दुसऱ्या दिवशी 1.77 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.05 कोटी, चौथ्या दिवशी 1.05 कोटी, पाचव्या दिवशी 0.55 कोटी, सहाव्या दिवशी 0.69 कोटी आणि सातव्या दिवशी 0.65 कोटींची कमाई केली. एकंदरीत रिलीजच्या सात दिवसांत या सिनेमाने 7.71 कोटींचा गल्ला जमवला आहे.


बॉलिवूडला टक्कर देणारा मराठी सिनेमा 'झिम्मा 2'


'झिम्मा 2' हा मराठी सिनेमा बॉलिवूडला टक्कर देणारा आहे. 'झिम्मा' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. याच दिवशी 'फर्रे' (Farrey) हा सिनेमाही प्रदर्शित झाला होता. सलमानची (Salman Khan) भाची अलीजेह अग्निहोत्री या सिनेमात मुख्य भूमिकेत होती. अलीजेहसह जूही बब्बर, साहिल मेहता, जेन शॉ, रोनित रॉय आणि प्रसन्ना बिस्ट हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते. सौमेन्द्र पाधी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे. रिलीजच्या सास दिवसांत या सिनेमाने 2.59 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत 'फर्रे'पेक्षा 'झिम्मा 2' या सिनेमाने जास्त कमाई केली आहे.


'झिम्मा 2'चा बोलबाला


कोरोनानंतर प्रदर्शित झालेला 'झिम्मा 2' हा सिनेमा चांगलाच चालला. या सिनेमाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे खेचून आणलं. त्यामुळे 'झिम्मा 2'कडूनही प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. 'झिम्मा 2' हा सिनेमा चांगला झाला आहे. या सिनेमाची तगडी स्टारकास्ट, कथानक, दिग्दर्शन, लेखन अशा सर्वच गोष्टी कमाल आहेत. आयएमडीबीमध्ये या सिनेमाला 8.4 रेटिंग मिळाले आहे.


'झिम्मा 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हेमंत ढोमेने (Hemant Dhome) सांभाळली आहे. तर इरावती कर्णिकने (Irawati Karnik)  या सिनेमाचं लेखन केलं आहे. तसेच सुहास जोशी (Suhas Joshi), निर्मिती सावंत (Nirmiti Sawant), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), क्षिती जोग (Kshitee Jog), सायली संजीव (Sayali Sanjeev), रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), शिवानी सुर्वे (Shivani Surve), सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar), अनंत जोग (Anant Jog) या अशी दमदार कलाकारांची फळी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.