Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या तिच्या आगामी 'घुंगरु' (Ghungroo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार असून आता या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 100 चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.


गौतमी पाटीलचा पहिला सिनेमा 'घुंगरु' हा सिनेमा आहे. तमाशा लोक कलावंत यांच्या जीवनाचे वास्तव मांडणारा 'घुंगरु' हा सिनेमा 15  डिसेंबर रोजी राज्यातील 100 स्क्रीनवर प्रदर्शित होणार असल्याचे या सिनेमाचे दिग्दर्शक बाबा गायकवाड (Baba Gaikwad) यांनी सांगितले . आज पंढरपूर येथे 'घुंगरु' सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्च दरम्यान गौतमी उपस्थित नव्हती. 


गौतमी पाटीलच्या आयुष्याचा संघर्ष उलगडणार


15 डिसेंबर पासून राज्यातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असलेल्या 'घुंगरु' या सिनेमात गौतमी पाटीलच्या आयुष्याचा संघर्ष दाखवण्यात आला असल्याचे  दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी सांगितले . तब्बल 100 स्क्रीनवर गौतमी पाटीलचा जीवन संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 10 डिसेंबर पासून गौतमी पाटील स्वतः या सिनेमाचे प्रमोशन राज्यातील प्रमुख शहरात करणार आहे. लावणी, प्रेम गीत आणि आयटम गीत अशी गाणी चित्रपटात असणार आहेत. देशातील सात राज्यात सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे . इतर भाषांतही हा चित्रपट डबिंग होणार असल्याचेही बाबा गायकवाड यांनी सांगितले . 


लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित 'घुंगरु'


गौतमीचा 'घुंगरु' हा सिनेमा लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. त्यामुळे गौतमीसाठी नक्कीच हा सिनेमा खूप खास असेल. या सिनेमात लव्हस्टोरी, लोककलावंतांचं आयुष्य त्यांचा संघर्ष, रहस्य अशा सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड (Baba Gaikwad) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे बाबा गायकवाड यांनीच या सिनेमाची कथा, पटकथा लिहिली आहे. तसेच तेच या सिनेमाचे निर्माते आहेत. 


गौतमी पाटीलच्या 'घुंगरु' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. महाराष्ट्राला आपल्या नृत्य अदांनी घायाळ करणारी गौतमी आता अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. 'घुंगरु' या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाची गौतमीचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील प्रथमच रुपेरी पडद्यावर! 'घुंगरु'चं पहिलं पोस्टर आऊट