Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


महेश कोठारे यांना मातृशोक; वडिलांच्या निधनानंतर सहा महिन्यांनी आईचं निधन


Mahesh Kothare Mother Saroj Kothare Passed Away : अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या आई आणि ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Maherchi Sadi : 'माहेरची साडी' सिनेमासाठी अलका कुबल यांनी किती मानधन घेतलं होतं?


Maherchi Sadi Marathi Movie : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान प्रेक्षकांना 'माहेरची साडी' (Maherchi Sadi) या ब्लॉकबस्टर सिनेमाची आठवण येत आहे. 'माहेरची साडी' हा सिनेमा 1991 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Marathi Serial : 'ठरलं तर मग' मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर


टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे. टीआरपी लिस्टमध्ये 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


शो मस्ट गो ऑन... मालिकेच्या शुटिंगदरम्यान अभिनेत्याची प्रकृती खालावली; सेटवरच उपचार सुरू


Ajinkya Raut : 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' (Abol Preetichi Ajab Kahani) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आणि जान्हवी तांबट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण या मालिकेच्या शुटिंगदरम्यान अजिंक्यला दुखापत झाली असून तो सेटवरच उपचार घेत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


'बाईपण भारी देवा'ने पार केला 50 कोटींचा टप्पा


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा दिवसेंदिवस नव-नवे रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे. बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांना मागे टाकत 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड करत आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या यशामुळे मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा बहरली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा