Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


मराठी सिने-सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांच्याबद्दल जाणून घ्या..


हँडसम फौजदार अभिनेता आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोद खन्ना अशी रविंद्र महाजनी यांची ओळख आहे. बेळगावात जन्मलेल्या रविंद्र महाजनी यांनी नोकरी करण्यासाठी मुंबई गाठली. शिक्षणादरम्यान रविंद्र महाजनी यांना अभिनयाची गोडी लागली होती. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रविंद्र महाजनी यांनी सिनेसृष्टीत नशीब आजमावायला सुरुवात केली. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


शाहीर विठ्ठल उमप यांनी गायलेलं पहिलं गीत कोणतं?


शाहीर विठ्ठल उमप यांच्या नावावर एक हजाराहून अधिक लोकगीते आहेत. तसेच 10 पेक्षा अधित सिनेमांत त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'टिंग्या आणि विहीर' अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. पोवाडा, बहुरुपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, डोंबारी अशा अनेक कलाप्रकारांत विठ्ठल उमप आघाडीवर होते.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


'मानापमान' मधील भामिनी ते 'शाकुंतल'मधील ‘शकुंतला’; बालगंधर्व यांच्या या भूमिकांनी प्रेक्षकांची जिंकली मने!


बालगंधर्व यांच्या शकुंतला या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. तेव्हापासूनच त्यांना नाटकामध्ये स्त्र आणि पुरूष अशा दोन्ही भूमिका साकारण्यास सुरुवात केली. नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म 26 जून 1888 रोजी झाला. 1905 साली किर्लोस्कर नाटक मंडलीच्या शाकुंतल नाटकातून त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; जाणून घ्या 15 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा सर्वत्र बोलबाला आहे. महिलांनी हा सिनेमा डोक्यावर उचलून धरला आहे. नावाप्रमाणेच 'बाईपण हे भारी' आहे हे या सिनेमाने दाखवून दिलं आहे.  रिलीजच्या दोन आठवड्यांनंतरही हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


'तुला काहीही होणार नाही, असं माझ्या आईनं मला तेव्हा सांगितलं'; अतुल परचुरे यांचा कॅन्सरशी लढा


Atul Parchure: नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांची कॅन्सरची झुंज, त्यादरम्यान येणारे अनुभव या सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा