Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा दिवसेंदिवस नव-नवे रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे. बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांना मागे टाकत 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड करत आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या यशामुळे मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा बहरली आहे. 


नागराज मंजुळेच्या 'सैराट' या सिनेमानंतर रितेश देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने दणदणीत कमाई केली होती. दरम्यान 'वाळवी' या सिनेमानेदेखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता होता. आता या सिनेमांच्या लाईनमध्ये केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा समावेश झाला आहे. 


'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection)


सॅकनिल्क एंटरटेनमेटच्या,'बाईपण भारी देवा' या सिनेमाने ओपनिंग डेला अर्थात रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.05 कोटींची कमाई केली होती. तर वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ झालेलं पाहायला मिळालं. रिलीजच्या पहिल्या आठवड्यात या सिनेमाने 12.4 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर याच सिनेमाला बोलबाला पाहायला मिळाला. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 24.95 कोटींची कमाई केली. तसेच रिलीजच्या 17 दिवसांत आतापर्यंत या सिनेमाने 50.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. 




तिसऱ्या आठवड्यातही दणक्यात सुरुवात


'बाईपण भारी देवा' हा सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. महिलावर्गाला हा सिनेमा मोठ्या प्रमाणात आवडत आहे. माऊथ  पब्लिसिटी आणि जोरदार प्रमोशनच्या जोरावर या सिनेमाला चांगलच यश आलं आहे. 'माहेरची साडी', 'चिमणी पाखरं' या सिनेमांप्रमाणेच 'बाईपण भारी देवा' या सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. आता तिसऱ्या आठवड्यातही या सिनेमाने दणक्यात सुरुवात केली आहे.


केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा'ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट; जाणून घ्या 15 दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...