Abhishek Bachchan Enters In Politics : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिषेक आता 'लोकसभा निवडणूक 2024'मध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. अभिषेक राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांमुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 


'ब्रीद', 'धूम 4', 'हाऊसफुल 5', 'दसवीं' अशा दर्जेदार सुपरहिट सिनेमांत अभिषेक बच्चनने काम केलं आहे. लवकरच त्याचे आणखी काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण आता तो राजकारणात एन्ट्री करणार असल्याचे म्हटले जात आहे.


भारत समाचारच्या रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन लवकरच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होणार आहे. तसेच 2024 च्या निवडणुकीत प्रयागराजमधून निवडणुक लढवणार आहे. वडिलांप्रमाणेच तो प्रयागराजमधून निवडणुक लढवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण अद्याप अभिषेक किंवा समाजवादी पक्षाने अधिकृत घोषणा केलेली नाही. 






बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत राजकारणात प्रवेश केला होता. 1984 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. पण जुलै 1987 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. तर जया बच्चन या पहिल्यांदा 2004-2006 मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2018 मध्ये त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या.


मी कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही : अभिषेक बच्चन


अभिषेकने (Abhishek Bachchan On Politics) 2013 साली एका मुलाखतीत राजकारणातील प्रवेशाबद्दल भाष्य केलं होतं. तो म्हणालेला,"माझे आई-बाबा राजकारणात आहे. पण राजकारणात एन्ट्री करण्याची आता तरी माझी इच्छा नाही. मी पडद्यावर राजकीय नेत्याची भूमिका साकारू शकतो पण खऱ्या आयुष्यात नाही. मी कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही". 


अभिषेक बच्चनचा 'दसवीं' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. या सिनेमात अभिषेक बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमसोबत झळकला होता. या सिनेमातील अभिषेकच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. आता अभिषेकच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Abhishek Bachchan : अभिषेक बच्चन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; जाणून घ्या खास गोष्टी...