Bal Gandharva: 'मानापमान' मधील भामिनी ते 'शाकुंतल'मधील ‘शकुंतला’; बालगंधर्व यांच्या या भूमिकांनी प्रेक्षकांची जिंकली मने!
नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म 26 जून 1888 रोजी झाला. 1905 साली किर्लोस्कर नाटक मंडलीच्या शाकुंतल नाटकातून त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशकुंतला या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. तेव्हापासूनच त्यांना नाटकामध्ये स्त्र आणि पुरूष अशा दोन्ही भूमिका साकारण्यास सुरुवात केली.
1911 साली कृष्णाजी खाडिलकरांच्या मानापमान या नाटकामध्ये बालगंधर्व यांनी साकारलेल्या भामिनी या भूमिकेनं नाट्यरसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. आपल्या सुमधुर आवाजानं आणि अभिनयाची मनं जिंकत होते.
वद जाऊ कुणाला शरण, मला मदन भासे, नाथ हा माझा या बालगंधर्व यांनी गायलेली पदे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होती.
बालगंधर्वांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली.
नंदिनी, सुभद्रा, देवयानी, रुक्मिणी अशा अनेक भूमिकांच्या माध्यमातून त्यांची प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर (नाटक), संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला, संगीत कान्होपात्रासह एकूण 25 विविध नाटकांत भूमिका साकारल्या.
15 जुलै 1967 रोजी बालगंधर्व यांचे निधन झाले. आजही नाट्यप्रेमींच्या मनातील स्थान हे अढळ आहे.