बेळगावात आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव अत्यंत महत्वाचा आहे. लघु चित्रपटाची जाणीव वाढवण्यासाठी सगळ्या कलाप्रेमींनी मिळून कार्य करण्याची आवश्यकता आहे. प्रादेशिक अस्मिता, भाषा याविषयी आम्ही नेहमी बोलत असतो आणि जपत असतो. लघु चित्रपट महोत्सव संस्कृतीचीही जाणीव आहे. ही जाणीव वाढवण्यासाठी तुम्हाला एकीने हातात हात मिळवून काम करण्याची गरज आहे. तुम्हीच याचे आधार बनून हात बळकट करावे लागणार असल्याचे जितेंद्रने सांगितले.
आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करायला पाहिजे. लघु चित्रपट महोत्सव म्हणजे काय असतो? याला किती खर्च येतो, आयोजक सगळे आयोजन कसे करतात याची जाणीव बेळगावकरांना यायला हवी. आयोजक बरेच कष्ट घेऊन महोत्सवाचे आयोजन करतात. त्यांच्या पाठीशी बेळगावकर जनतेने उभारले पाहिजे. म्हणजे या आयोजक तरुणांचा उत्साह अधिक वाढेल, असे मतही जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
रविवारी आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवाची सांगता होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 180 लघु चित्रपटातून 58 लघु चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, जर्मन, स्पॅनिश, श्रीलंकन, कन्नड, इटालियन चित्रपट यावेळी रसिकांना पाहायला मिळणार आहेत.
संबंधित बातम्या :
CAA Protests | ट्वीटमुळे अभिनेता फरहान अख्तरविरोधात तक्रार
पहिल्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हल दणक्यात पार, विविध सेलिब्रिटींची उपस्थिती
सिम्पल लूकमध्ये 'पंगा' घेणार कंगना, पाहा आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक
ABNS I शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड I एबीपी माझा