मुंबई : पहिल्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हलची 17 डिसेंबर 2019 रोजी दणक्यात सुरुवात झाली. दोन दिवसांत जगभरातील एकूण 15 चित्रपट इथे प्रदर्शित झाले. हे सर्व चित्रपट डोळ्याला सुंदर अनुभव देणाऱ्या कलाकृती होती. चित्रपटांच्या कलाकार आणि निर्मात्यांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसा मिळाली. या फेस्टिव्हलमध्ये अभिनेता राहुल बोस, शेफ विकास खन्ना, अभिनेत्री अंजली पाटील, अभिनेता-लेखक इनाममुल्हाक, अभिनेत्री बिदिता बॅग, लेखक सागर सरहदी, लेखक आणि अभिनेते विक्रम कोचर उपस्थित होते.
हा फेस्टिव्हल म्हणजे पाळण्यामध्ये असलेल्या बाळासारखा आहे, अशा शब्दात संस्थापक प्रगेश सिंह यांनी या महोत्सवाचं वर्ष केलं. तसंच येणाऱ्या वर्षासाठी महोत्सवासाठी खूप साऱ्या योजना आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, "फेस्टिव्हलची सुरुवात मुंबईपासून करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही सिनेमाची पवित्र भूमी आहे आणि म्हणून इथून आशीर्वाद घेऊन सुरुवात करणं शुभ आहे."
जे आधीपासूनच उद्योगातील भाग आहेत त्यांनाच नाही तर ज्यांना या उद्योगाचा भाग होण्याची इच्छा आहे, अशा नव्या टॅलेण्टला प्रोत्साहन देणे हे गोल्डन ज्युरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ध्येय आहे.
गोल्डन फिल्म फेस्टिव्हलचे संचालक शुभ्रांसू दास म्हणाले की, "प्रतिसाद चांगलाच होता आणि तो एक रोमांचक अनुभव होता. महोत्सवाचे दिग्दर्शक या कार्यक्रमामुळे खूप खुश होते, पहिल्या वर्षीच्या प्रतिसाद बघून, पुढच्या वर्षीच्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हलमधून त्यांना बरीच आशा आहे.
समारोप समारंभात 16 वेगळ्या श्रेणीतल्या कलाकारांना सम्मानित केलं. या महोत्सवामध्ये 117 चित्रपटांपैकी काही सर्वोत्कृष्ट कलाकारांना निवडले आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेता - नसिरुद्दीन शाह (द वॉलेट),
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नवनी परिहार (वॉलेट)
सर्वोत्कृष्ट भूमिका - मीना (चुहेदानी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट - (फॉरबिडेन मसाला) दिग्दर्शक राहुल चतुर्वेदी
ज्युरी विशेष उल्लेख - नीना गुप्ता (द लास्ट कलर)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनिंग - रसूल पोकुट्टी (सॅक्स बाय ज्युलियस)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - नीरज यादव (सॅक्स बाय ज्युलियस)
पहिल्या गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हल दणक्यात पार, विविध सेलिब्रिटींची उपस्थिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2019 03:42 PM (IST)
या फेस्टिव्हलमध्ये अभिनेता राहुल बोस, शेफ विकास खन्ना, अभिनेत्री अंजली पाटील, अभिनेता-लेखक इनाममुल्हाक, अभिनेत्री बिदिता बॅग, लेखक सागर सरहदी, लेखक आणि अभिनेते विक्रम कोचर उपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -