Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या 'संघर्षयोद्धा'चं शूटिंग पूर्ण; लवकरच सिनेमा होणार प्रदर्शित!
Manoj Jarange : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आयुष्यावर आधारित 'संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.
Manoj Jarange Movie : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आयुष्यावर आधारित 'संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.
मराठा (Maratha) समाज हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा समाज असल्यामुळे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या सिनेमाचं चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे पूर्ण झाले असून आता हा चित्रपट येत्या 26 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
'संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील' या सिनेमाची निर्मिती सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील (Rohan Patil) यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी सिनेमाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे, तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे .
'संघर्षयोद्धा'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या (SangharshYoddha Starcast)
'संघर्षयोद्धा' या सिनेमात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणून मराठा समाजाची एक वेगळीच ओळख आहे.
इतिहासात शेतकरी आणि योद्धे म्हणून मराठ्यांना ओळखले जायचे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी "एक मराठा, लाख मराठा" म्हणत 2016 मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे पाटील...
आंदोलन, उपोषणे करून मनोज जरांगेंनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे. अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे, या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित केल्या पासूनच लोकांमध्ये या सिनेमाची खूपच उत्सुकता आहे. त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल़्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे.
संबंधित बातम्या