Manoj Bajpayee Joram Trailer Out : डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि बादशाह शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunky) आणि 'अॅनिमल' (Animal) हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. दोन्ही सिनेमांसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. पण या दोन्ही सिनेमांना टक्कर देणारा अभिनेता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) आगामी 'जोरम' (Joram) हा सिनेमा 8 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

Continues below advertisement

नवजात लेकीचा जीव वाचवण्यासाठीचा वडिलांचा संघर्ष

'जोरम' हा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. या सिनेमात मनोजने दसरू ही भूमिका साकारली आहे. नवजात लेकीचा जीव वाचवण्यासाठीचा संघर्ष करणाऱ्या वडिलांची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. देवाशीष मखीजा यांनी या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

'जोरम'बद्दल जाणून घ्या...

मनोज वाजपेयी साकारत असलेलं 'दसरू' हे पात्र एका गावात राहणारं आहे. पण त्याच्या आयुष्यात असा काही ट्वीस्ट येतो की त्याला ते गाव सोडावं लागतं. आपल्या तीन महिन्याच्या लेकीला वाचवण्यासाठी तो गाव सोडून मुंबई गाठतो. तर दुसरीकडे पोलीस आणि व्यवस्थेचाही त्याला सामना करावा लागतो. ट्रेलर रिलीज झाल्याने सिनेमाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

'जोरम'चा भाग असल्याचा मला आनंद आहे : मनोज वाजपेयी

'जोरम' या सिनेमाबद्दल बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले,"जोरम' या सिनेमाचा भाग असल्याचा मला आनंद होत आहे. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे". मखीजा फिल्म्स आणि झी स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात मनोज वाजपेयीसह स्मिता तांबे आणि मेघा माथुर मुख्य भूमिकेत आहेत. अनेक चित्रपट महोत्सांमध्ये हा सिनेमा दाखवला गेला आहे. तनिष्का चॅटर्जी आणि राजश्री देशपांडे हे कलाकारही या सिनेमात लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. येत्या 8 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Sirf Ek Banda Kafi Hai Review : मनोज वाजपेयीचा 'सिर्फ एक बंदा काफी है' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...