Amitabh Bachchan Bungalow :  बिग बी अमिताभ बच्चन यांनी जुहू भागातला प्रतीक्षा बंगला आपल्या मुलीच्या नावावर केला आहे. बच्चन कुटुंबीय आधी याच बंगल्यात राहायचं. काही वर्षांपूर्वी ते जलसा बंगल्यात राहायला गेले. दरम्यान हा करार 8 नोव्हेंबर रोजी रजिस्टर करण्य़ात आला. त्यासाठी बच्चन यांनी 50 लाख रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरल्याचं देखील समजतंय. या बंगल्याची मार्केट व्हॅल्यू 50 कोटी 83 लाख इतकी आहे. हा बंगला दोन प्लॉटवर उभारण्यात आलाय. एक प्लॉट अमिताभ आणि जया यांच्या नावावर होता, तर दुसरा प्लॉट केवळ अमिताभ यांच्या नावावर होता. बच्चन कुटुंबीयांच्या जुहू भागात पाच मोठ्या प्रॉपर्टी आहेत. जलसा, प्रतीक्षा, जनक हे तीन बंगले आहेत, तर जलसाच्या मागचा बंगला देखील काही वर्षांपूर्वी बच्चन यांनी खरेदी केला होता. तस वत्स नावाचा बंगला हा दीर्घकालीन भाडेतत्वावर सिटीबँकला देण्यात आला आहे.


दिवाळीच्या आधी मुलाला भेट दिला बंगला - 


मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या मुलीला दिवाळीच्या आधी 50 कोटींचा प्रतीक्षा बंगला भेट दिला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा फॅशन डिजाइनर आहे. अमिताभ बच्चन यांनी 8 नोव्हेंबर रोजी श्वेताला बंगला भेट दिला. हा बंगला 890.47 चौरस मीटर आणि 674 चौरस मीटरच्या  दोन प्लॉटवर उभारण्यात आलाय.  दोन्ही प्लॉट विठ्ठल नगर सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडचा भाग असल्याचे कागदपत्रातून समजतेय.   8 नोव्हेंबरला भेटवस्तू डीडद्वारे श्वेता बच्चनला देण्यात आली. अमिताभ बच्चन यांनी 50.65 लाख रुपयांची स्टॅम्प ड्यूटीचा व्यावहार केला. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी एकत्रित सह्या करत हा बंगला मुलीच्या नावावर केला.


 बंगल्याची किंमत किती?


रिपोर्ट्सनुसार, जुहू भागातला प्रतीक्षा या बंगल्याची मार्केट व्हॅल्यू 50 कोटी 83 लाख इतकी आहे. प्रतीक्षा बंगला अमिताभ बच्चन यांना खूपच प्रिय आहे. कारण, या बंगल्याचे नाव त्यांच्या वडिलांनी ठेवले होते.  


अमिताभ बच्चन यांचे पुढील चित्रपट


अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती हा शो होस्ट करत आहेत. त्याशिवाय ते काही चित्रपटाच्या शुटिंगमध्येही व्यस्त आहेत. नाग अश्विन यांच्या कल्कि 2998 AD मध्ये बच्चन दिसणार आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि प्रभास यांच्याही भूमिका आहेत. ते थैलाइवर 170 मध्येही दिसतील. यामध्ये ते रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. हे दोन स्टार 33 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत.