एक्स्प्लोर

Manasi Naik: मानसी नाईककडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विभक्त होण्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाली...

मानसी नाईकचा (Manasi Naik) घटस्फोट होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मानसीनं सांगितलं आहे की, तिनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

Manasi Naik: मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसीचा घटस्फोट होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मानसीनं या चर्चेवर मौन सोडलं आहे. 

काय म्हणाली मानसी? 

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर घटस्फोटाच्या सुरु असलेल्या चर्चेबाबत मानसीनं सांगितलं, 'हे खरं आहे. मी याबाबत खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे, त्याची प्रक्रिया सध्या होत आहे. मी सध्या खूप भावूक झाले आहे.'

पुढे तिनं सांगितलं, 'काय चूक झाली, याबाबत मी काही सांगू शकत नाही.  हे सर्व खूप लवकर घडले. माझा अजूनही प्रेमावर विश्वास आहे, मला पुन्हा प्रेम करायचे आहे. एक काळ असा होता की मला कुटुंब हवे होते आणि मग मी लग्न केले. अर्थात, ते खूप लवकर घडले त्यामुळे मला वाटते की हे सर्व तिथेच चुकले. माझ्यासाठी या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. मला त्यांच्या (प्रदीप खरेरा) कुटुंबाबद्दल आणि त्यांच्याबद्दल खरोखर आदर आहे. पण एक स्त्री म्हणून मला स्वाभिमान आहे.' पुढे मानसीनं सांगितलं की, सध्या ती करिअरकडे लक्ष केंद्रित करणार आहे. 

प्रदीपची पोस्ट: 

नुकतीच प्रदीपनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, ' रो रहाँ हू एक मुद्दत से, इश्क जो हो गया था शिद्दत से,तजुर्बा है तभी तो कहं रहा हूँ, मौत अच्छी है इस मोहोब्बत से!' त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 
Manasi Naik: मानसी नाईककडून घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विभक्त होण्याच्या चर्चेवर पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाली...

मानसीनं प्रदीपला सोशल मीडियावर अनफॉलो केलं तसेच तिनं प्रदीपसोबतचे सर्व फोटो डिलीट केले. त्यामुळे ते दोघे विभक्त होणार आहेत,अशी चर्चा सोशल मीडियावर झाली. 

 19 जानेवारी 2021 रोजी मानसी आणि प्रदीप लग्नबंधनात अडकले. प्रदीप आणि मानसीच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या दोघांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मानसीचा एकदम कडक हा चित्रपट 2 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. तिच्या  'बाई वाड्यावर या', 'वाट बघतोय रिक्षावाला'  या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. मानसी तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Manasi Naik : मानसी नाईकचा घटस्फोट? चर्चांवर मानसी नाईक अप्रत्यक्षरित्या म्हणाली,"डोळ्यासमोर काळी पट्टी बांधली..."

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget