एक्स्प्लोर

Malaika Arora And Arbaaz Khan: 19 वर्षे टिकलेले मलायका आणि अरबाजचे नाते कोणत्या कारणामुळे तुटले? स्वत: आरबाजनं केला खुलासा

Malaika Arora And Arbaaz Khan: मलायकाच्या ड्रेसिंग सेन्समुळे दोघांचा घटस्फोट झाला अशी चर्चा सुरु होती. पण याबाबत स्वत: अरबाजनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 

Malaika Arora And Arbaaz Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची ओळख एकेकाळी 'बॉलिवूडचे पॉवर कपल' अशी होती. पण 2017 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मलायकाच्या ड्रेसिंग सेन्समुळे दोघांचा घटस्फोट झाला अशी चर्चा त्यावेळी सुरु होती. पण याबाबत स्वत: अरबाजनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 

फोटोशूटदरम्यान झाली भेट

मलायका आणि अरबाज यांची भेट 90 च्या दशकात एका फोटोशूटदरम्यान झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि   मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

1998 मध्ये बांधली लग्नगाठ

1998 मध्ये अरबाज आणि मलायका यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले.  2002 मध्ये मलायका आणि अरबाज हे आई-बाबा झाले. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव अरहान असं ठेवलं. 

19 वर्षाच्या संसारानंतर घेतला घटस्फोट घेण्याचा निर्णय

जवळपास 19 वर्षाच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायका अरोरा हिने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, तिला पुढील जन्मातही खान कुटुंबाची सून व्हायचे आहे. पण नंतर अरबाज आणि मलायका यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे, अशा अनेक बातम्या समोर आल्या.


Malaika Arora And Arbaaz Khan: 19 वर्षे टिकलेले मलायका आणि अरबाजचे नाते कोणत्या कारणामुळे तुटले? स्वत: आरबाजनं केला खुलासा

मलायकाची ड्रेसिंग स्टाईलमुळे अरबाजनं घेतला होता घटस्फोट घेण्याचा निर्णय?

मलायका आणि अरबाज यांच्या घटस्फोटामागे नेमके कारण काय आहे? हे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे होते.  तसंच मलायकाची ड्रेसिंग स्टाईल किंवा फॅशनमुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला होता.याबाबत अरबाजला देखील एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यानं उत्तर दिलं, "मलाइकाच्या कपड्यांवर मी कधीही कोणतेही बंधन घातलेले नाही. मलायकाच्या कपड्यांचे मी नेहमीच समर्थन करत आलो आहे. कारण मला माहीत आहे की एखाद्याला एखादी गोष्ट करण्यापासून रोखले तर तो तेच काम सतत करतो. त्यामुळे मलायकाच्या फॅशन स्टाइलबद्दल मी कधीच काही बोललो नाही."

मलायका आणि अरबाज यांचे नाते तुटण्याचे कारण आजूनही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. पण दोघांमध्ये मतभिन्नता होती. यानंतर दोघेही वेगळे झाले.वर्ष 2017 मध्ये घटस्फोटानंतर मलायका अरोराने अभिनेता अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली. मलायका आणि अर्जुन यांना त्यांच्या वयातील अंतरामुळे अनेकवेळा ट्रोल देखील केलं जातं.

संबंधित बातम्या:

Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर

 

महत्त्वाच्या बातम्या

Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Salman Khans Sultan: दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
दिग्दर्शकासोबत फार्महाऊसला गेली, पण सलमान खानने केलं रिजेक्ट, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत नेमकं घडलं काय?
Ramayana Part 1: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये कुंभकर्ण कोण? रहस्य उलगडलं; 'पंचायत' फेम अभिनेत्याची चर्चा
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?
'जना नायगन'चा शनिवारीही जलवा; हॉलिवूडच्या 'स्पायडर - मॅन'ला दिली टक्कर, किती कोटी कमावले?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Embed widget