एक्स्प्लोर
VIDEO : मेकिंग ऑफ 'बाहुबली 2', भव्यदिव्य सेटची सफर

मुंबई : 'बाहुबली 2' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केल्यानंतर दिग्दर्शक एस एस राजमौली यांनी चाहत्यांसाठी सिनेमाच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. चाहत्यांमध्ये 'बाहुबली - द कन्क्लुजन'बद्दलची उत्सुकता वाढवण्यासाठी दिग्दर्शकाचा प्रयत्न सुरु आहे.
सिनेमाचा फर्स्ट लूक
18 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रभासच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फर्स्ट लूक जारी करण्यात आला. पोस्टरवर प्रभास अर्थात बाहुबल आक्रमक दिसत आहे. त्याच्या एका हातात तलवार असून दुसऱ्या हाताला साखळी आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रभास पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात जास्त मस्क्युलर लूकमध्ये दिसत आहे.
‘बाहुबलीः दी कन्क्लुझन’ चा लोगो रिलीज
सुमारे सहा मिनिटांचा हा व्हिडीओ 'बाहुबली'च्या ट्विटर हँडल, यू ट्यूब अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. राजमौली, देवसेना, भल्लाल देव, कटप्पा आणि बाहुबली यांच्या भूमिका साकारणारे कलाकार चाहत्यांशी संवाद साधत असल्याचं दिसत आहे. 'बाहुबली 2' च्या मेकिंगचा व्हिडीओ अतिशय दमदार आहे. या व्हिडीओत कलाकार सिनेमाच्या भव्य सेट्सची सफर घडवताना दिसत आहेत. इतकंच नाही तर कटप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज हे बाहुबलीला का मारलं? याबद्दल सांगत आहेत.‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!
सिनेमाचा फर्स्ट लूक
18 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रभासच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी फर्स्ट लूक जारी करण्यात आला. पोस्टरवर प्रभास अर्थात बाहुबल आक्रमक दिसत आहे. त्याच्या एका हातात तलवार असून दुसऱ्या हाताला साखळी आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रभास पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात जास्त मस्क्युलर लूकमध्ये दिसत आहे.
बाहुबली 2 चा फर्स्ट लूक मोशन पोस्टर
प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना, अनुष्का शेट्टी आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बाहुबली - द कन्क्लुजन' 28 एप्रिल, 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?' या बहुप्रतिक्षीत प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. पाहा व्हिडीओआणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement