एक्स्प्लोर

माझा कट्टा : शोभा डेंच्या त्या ट्विटबाबत आमीर म्हणतो...

मुंबई : इतर देश खेळात पुढे आहेत ते ठिक आहे, पण आम्हीही पुढे जाऊ. भारताचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी खूप कष्ट घेत आहेत. लेखिका शोभा डे यांनी खेळाडूंविषयी केलेलं ट्विट किंवा त्यांच्या मताशी मी सहमत नाही, असं बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान म्हणाला.   आमीर खान आणि सत्यजीत भटकळ यांनी पाणी फौंडेशनच्या कार्याची माहिती 'माझा कट्टा'वरुन दिली.   यावेळी आमीरला ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं. तसंच लेखिका शोभा डे यांनी केलेल्या ट्विटबाबतही प्रतिक्रिया विचारण्यात आली.   शोभा डेंबाबत मी काय बोलू आमीर म्हणाला, "सोशल मीडियावर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मात्र भारताचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी खूप कष्ट घेत आहेत. अनेक वर्षांची मेहनत त्यांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवते. ऑलिम्पिकसाठी पात्र होणं हेच आमच्यासाठी मोठं आहे. हार-जीत तर होत राहते. त्यामुळे शोभा डे यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार".   शोभा डेंचं ट्विट शोभा डे यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची थट्टा उडवली होती. ट्विटरवरुन शोभा डे यांनी भारतीय पथकावर निशाणा साधला होता. भारतीय पथकाचं एकच लक्ष आहे, रिओला जा, सेल्फी काढा आणि रिकाम्या हाती परत या. पैसा आणि संधी वाया घालवा अशा प्रकारचा ट्वीट शोभा डे यांनी केलं होतं. त्यावरुन शोभा डे यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.   साक्षी मलिकची मॅच रात्री जागून पाहिली पैलवान साक्षी मलिकने कालच रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. त्याबाबत बोलताना आमीर म्हणाला, "साक्षी उत्तम खेळली. साक्षीची संपूर्ण मॅच मी रात्री जागून पाहिली. साक्षी पिछाडीवर पडल्याने धाकधूक होत होती. पण तीने शेवटच्या क्षणी मुसंडी मारुन जबरदस्त कामगिरी केली आणि भारताला पदक मिळवून दिलं. साक्षीची कामगिरी खूपच उत्तम होती".   विनेश फोगटची दुखापत दुर्दैवी यावेळी आमीरने काल ऑलिम्पिकमध्ये पैलवान विनेश फोगटला झालेली दुखापत दुर्दैवी असल्याचं नमूद केलं. विनेशने आपल्याला सुवर्णपदक मिळवून दिलंच असतं, असा विश्वास आमीरने व्यक्त केला.   विनेश फोगट या भारतीय महिला पैलवानाला कालच्या कुस्तीदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे ती ऑलिम्पिकबाहेर पडली आहे.   बबिता कुमारीकडून आशा दरम्यान आज विनेश फोगटची चुलत बहिण पैलवान बबिता कुमारी ही आज कुस्तीच्या मैदानात उतरणार आहे. आमीरने बबिता कुमारही पदक जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तर गीताच्या कामगिरीकडेही लक्ष असल्याचं आमीर म्हणाला.   आमीरचा आगामी दंगल सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात आमीर खानने पैलवान महावीर फोगट यांची भूमिका साकराली आहे. बबिता आणि गीता या महावीर फोगट यांच्या मुली आहेत. तर काल पदक जिंकलेली विनेश ही महावीर यांची पुतणी आहे.

संबंधित बातमी

शोभा डेंकडून रिओ ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची थट्टा

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भुरळ, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget