Emergency : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' (Emergency) या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी देखील कंगनाच पार पाडत आहे. तिच्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरमधील कंगनाचा लूक पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले होते. या चित्रपटात अभिनेते अनुपनम खेर तसेच श्रेयस तळपदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आता या चित्रपटात अभिनेत्री महिमा चौधरीची (Mahima Chaudhry) एन्ट्री झाली आहे. 


अभिनेत्री महिमा चैधरी ही  'इमर्जन्सी' या चित्रपटात पुपुल जयकर यांची भूमिका साकारणार आहे. पुपुल जयकर या भारतीय सांस्कृतिक कार्यकर्त्या आणि लेखका होत्या. महिमानं तिच्या या भूमिकेच्या लूकचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिमानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आता तिला  इमर्जन्सी या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


पाहा महिमाची पोस्ट:



इमर्जन्सी चित्रपटामध्ये  श्रेयस तळपदे हा अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. तसेच अनुपम खेर हे या चित्रपटात जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत.


2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डार्क चॉकलेट' या चित्रपटानंतर महिमानं अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला. महिमाच्या परदेस या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तसेच महिमानं धडकन, ओम जय जगदीश या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या डार्क चॉकलेट चित्रपटामध्ये महिमानं प्रमुख भूमिका साकारली. परदेस चित्रपटामधील शाहरुख आणि महिमाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 2006 साली महिमानं  बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. पण 2013 मध्ये महिमानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: