Kareena Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) सध्या ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत आहेत. करीनानं नुकतीच  ‘केस तो बनता है’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात तिनं केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 


जब वी मेट आणि करीना 
कोर्ट रुम कॉमेडी शो ‘केस तो बनता है’मध्ये करीनानं तिच्या जब वी मेट या चित्रपटाबद्दल सांगितलं. हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात करीनानं गीत ही भूमिका साकारली होती. ही गीत आदित्य कश्यपला भेटते, त्यानंतर जे काही होत ते पाहून प्रेक्षक खळखळून हसतात. या भूमिकेबद्दल ‘केस तो बनता है’ मध्ये करीना म्हणाली, माझ्या गीत या भूमिकेमुळे रेल्वेला नक्कीच आर्थिक फायदा झाला असेल. तसेच मी या चित्रपटात घातलेल्या हेरम पँटच्या विक्रीमध्ये देखील वाढ झाली असेल. ' त्यानंतर करीनानं ‘अब तू सिखाएगा मुझे, सिखडी हूं मैं भटिंडा की, सब आता है मुझे, ट्रेन पकडने से लेकर केस जीतने तक’ हा डायलॉग म्हणून दाखवला. 


हे कलाकार लावणार हजेरी
‘केस तो बनता है’ हा शो एक मजेशीर शो आहे. यामध्ये अभिनेता रितेश देशमुख हा एक वकिलाची भूमिका साकारतो तर कुशा कपिला ही परिक्षकाची भूमिकी साकारते. करीनाबरोबत अनिल कपूर, वरुण धवन आणि करण जोहर हे कलाकार देखील या शोमध्ये सहभागी होणार आहेत. अॅमेझॉन मिनीट टिव्हीवर प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकणार आहेत. 


करीनाच्या चित्रपटावर नेटकऱ्यांचा बहिष्कार


लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18  स्टडियोज  यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटावर नेटकऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: