Thiruchitrambalam : साऊथ स्टार धनुषच्या (Dhanush) अभिनायाला प्रेक्षकांची पसंती मिळते. धनुषच्या 18 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या 'थिरुचित्रम्बलम' (Thiruchitrambalam) या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. प्रेक्षकांची मनं या चित्रपटानं जिंकलं आहे. धनुषच्या नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या ग्रे मॅन चित्रपटाला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही पण आता धनुष 'थिरुचित्रम्बलम' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन.... 


पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन



'थिरुचित्रंबलम' हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन मिथ्रन जवाहर यांनी केले आहे. धनुष व्यतिरिक्त या चित्रपटात राशी खन्ना, नित्या मेनन आणि प्रकाश राज सारखे दमदार कलाकार आहेत. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी कोट्यवधींच कलेक्शन करुन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पहिल्या दिवशी या चित्रपटानं तामिळनाडूमध्ये 6 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं एकूण कलेक्शन हे   सुमारे नऊ कोटी आहे. धनुषच्या हा चित्रपट विकेंडला जास्त कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


'थिरुचित्रंबलम' एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला 


धनुषचा 'थिरुचित्रंबलम' देखील पायरसीचा बळी ठरला आहे. हा चित्रपट अनेक वेबसाइटवर एचडी प्रिंटमध्ये लीक झाला आहे. संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टी ही सध्या पायरसीशी लढत आहे. आता धनुषच्या या चित्रपटाचाही बळींच्या यादीत समावेश झाला आहे. त्याचाही कमाईवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.


'थुलुवधो इलमई' या कस्तुरी राजा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून धनुषनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. धनुषचं खरं नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा असं आहे. करिअरच्या सुरुवातीला धनुषला त्याच्या लूकमुळे अनेकांनी ट्रोल केलं होतं. आज धनुषनं हॉलिवूड, बॉलिवूड अन् साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: