Sanjay Kapoor Extra Marital Affair  :  बोनी कपूर (Boney Kapoor) आणि अनिल कपूरचा (Anil Kapoor) भाऊ आणि अभिनेता संजय कपूरच्या (Sanjay Kapoor) पत्नीने त्यांच्या नात्यामधील काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याचप्रमाणे तिने संजयच्या लग्नानंतरच्या अफेअर्सविषयी देखील भाष्य केलं आहे. लग्नानंतरही संजयचे अनेक अफेअर्स होते, असं यावेळी संजय कपूरची पत्नी महीप कपूर हिनं म्हटलं.                       


संजयच्या भूतकाळामुळे तो त्याच्या मुलीविषयीही अत्यंत संवेदनशील झाल्याचंही यावेळी त्याच्या बायकोनं म्हटलं आहे. त्यामुळे तो त्याच्या मुलीविषयी अत्यंत स्ट्रीक्ट असल्याचंही यावेळी महिपने सांगितलं. जे त्याने इतर मुलींसोबत केलं तेच त्याच्या मुलीसोबत कुणी करु नये, असं त्याला वाटतं, म्हणून तो मुलीबाबत जास्त पझेसिव्ह असल्याचं म्हटलं आहे. 


संजय मुलीच्या बाबतीत आहे जास्त स्ट्रीक्ट


महीप कपूरने झूमसोबत बातचीत करताना या सगळ्यावर भाष्य केलं आहे. संजय आणि तुझ्यापैकी मुलांच्या बाबतीत सर्वात जास्त स्ट्रीक्ट कोण आहे? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी महीपने म्हटलं की, 'मला असं वाटतं की संजय जास्त स्ट्रीक्ट आहे. त्याने आतापर्यंत अनेक मुलींना डेट केलंय. पण यानंतर त्याला त्याच्या चुकांची जाणीव झालीये. त्यामुळे तो त्याच्या मुलीबाबत जास्त स्ट्रीक्ट आहे आणि नेहमीच तिच्या काळजीत असतो. आमच्या मुलाबाबत तो खूप नॉर्मल आहे, पण आमची मुलगी शनायाबाबत तो जरा जास्तच काळजी करतो. मग अशावेळी मला त्याला शांत करावं लागतं. नंतर असं वाटतं की, कदाचित त्याला असं वाटत असावं, जे त्याने इतर मुलींसोबत केलं तेच त्याच्या मुलीबाबत कुणी करु नये. पण सध्या तो थोडा शांत झालाय.' 


महीपने 2022 मध्ये नेटफ्लिक्सच्या फॅब्युलस लाईव्स्ज ऑफ बॉलीवूड वाईफ या कार्यक्रमात संजय कपूरच्या लग्नानंतरच्या अफेअर्सविषयी देखील भाष्य केलं होतं. यावेळी महीपने सीमा सजदेहसोबत संवाद साधताना म्हटलं की, 'तुला माहितेय का सीमा, लग्नानंतरही संजयचे अफेअर्स होते. त्यामुळे मी आमच्या मुलीला घेऊन निघूनही गेले होते. तेव्हा माझ्यासाठी उभी राहिले. पण नंतर मला मुलगा झाला. त्यानंतर एक बाई आणि आईमध्ये मी आईची निवड केली.' 


ही बातमी वाचा : 


Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर