Gaurav More Trolling : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमातून घराघरात पोहचलेला फिल्टरपाड्याचा गौरव मोरे (Gaurav More) हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. त्याच्या विनोदाच्या टायमिंगमुळे आणि अभिनयामुळे त्याने प्रेक्षकांची मनं जिंकलीत. पण आता गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून बाहेर पडून हिंदी रिऍलिटी शोकडे आपला मोर्चा वळवला आहे. तो सध्या सोनी टिव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असल्याचं पाहायला मिळतंय. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ गौरव सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. अशाच एक व्हिडिओवर एका नेटकऱ्याने गौरवला ट्रोल केलं आहे. तर गौरवनेही या नेटकऱ्यांना जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय.
गौरवच्या एका व्हिडिओवर कमेंट करत त्याला रानू मंडल म्हटलंय. त्याचप्रमाणे त्याचा फिल्टरपाड्याचा गुंड असा देखील उल्लेख करण्यात आलाय. यावर गौरवनेही जशास तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच त्याच्या काही चाहत्यांनी त्याला अशा लोकांना उत्तर देण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. सध्या गौरव मोरेला बरंच ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असल्याचं पाहायला मिळतंय.
फिल्टरपाड्याचा गौरव मोरे ट्रोल
एका नेटकऱ्याने गौरवच्या पोस्टवर कमेंट करत त्याचा उल्लेख फिल्टरपाड्याचा गुंड असा केला आहे. यावर त्या नेटकऱ्याने म्हटलं की, 'राणू मोंडल झालाय बिचारा गौरव , fame मिळालं आणि स्वतःला महान समजायला लागला त्याला वाटलं online fans त्याचे movies बघतील , shows चा trp वाढवतील पण प्रत्यक्षात वेगळच होताना दिसतंय आणि पुढे पण दिसत राहणार आणि एका point ला सगळं हातातून जाणार चांगला actor होता म्हणून काय ते वाईट वाटतं असे थुक्रट विनोद मारताना बघून , भोजने चा पण तसंच झालं , नशिबात जे लिहिलंय ते होणारच.'
यावर गौरवनेही या नेटकऱ्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यावर गौरवने म्हटलं की, 'आधी स्वत:च्या अकाऊंटवरुन बोला मग आमच्याबद्दल बोला. पुढे त्या नेटकऱ्याने म्हटलं की, मग हे अकाउंट कोणाचा आहे ? स्वतःच्या account ने म्हणजे नक्की काय असत ? स्वतःचा नाव mentioned असलेलं account? म्हणजे नाव बघून reply देणार कि खरा photo बघून त्यावर comment करणार ?' यावर गौरवच्या एका चाहत्याने अशा लोकांना उत्तर न देण्याचा सल्ला गौरवला दिला. त्यावरही त्या नेटकऱ्याने कमेंट् केली आहे. त्याने म्हटलं की, 'अरे लेका कोणाच्या बाजूने बोलतोयस तू नक्की ? माझ्या कि महाराज गौरवादित्य ?मराठी चांगल हे माझ आहे म्हणणं आणि तू स्वतःच बोलतोयस हिंदी काहीच नाही मराठी पुढे मग मी judge करणारच ना जर हा मराठी पेक्षा हिंदी ला महत्व देत असेल तर , बच्ची बच्ची वाला फिल्टरपाड्याचा गुंड.'
'स्वत:च्या कुटुंबासोतही असंच बोलता का?'
'अहो फुकट कमेंट आहे म्हणून काहीही बोलायचं नसतं. घरी पण स्वतःच्या कुटुंबाबरोबर असंच बोलता का? स्वतःचा फोटो ठेवायला हिंमत लागते जी आपल्यात नाहीये. राहिला प्रश्न गुंडाचा तर कधी वेळ मिळाला तर चकर मारा फिल्टरपाड्याला सगळे समज-गैरसमज दूर होतील आणि हो स्वतःचा फोटो लावून बड्या बड्या बाता मारा कळलं का?' असं म्हणत गौरवने पुन्हा त्या ट्रोलरला चोख उत्तर दिलं आहे. यावर त्या नेटकऱ्याने म्हटलं की, 'मुळात तुमच्या सारखं दिसणारा व्यक्ती एवढा का मागे आहे कळत नाही चेहरा बघण्याच्या ? हिम्मत का लागते स्वतःचा फोटो ठेवायला ? काही लोकांना नाही आवडत स्वतःचे फोटो लावायला त्यात अगदी हिम्मत नाही वगरे असा बालिश विचार मी तरी नाही केला अजून आणि फिल्टरपाडा अस्वछ आहे area sorry मला allergy होईल पण मी मान्य करतो तू तिथला hero अशील no doubt'
या कमेंटवॉरमध्ये अनेकांनी सहभागी होत, गौरवच्या बाजूने त्या नेटकऱ्याला चांगलेच खडेबोल सुनावल्याचंही पाहायला मिळालंय. त्यामुळे सध्या गौरव मोरे हा ट्रोल जरी होत असला तरी तो त्या ट्रोलर्सना चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय.