(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swara Bhasker: महात्मा गांधींच्या स्मृतीदिनी स्वराचं ट्वीट; म्हणाली, 'गांधी हम शर्मिंदा हैं...'
Swara Bhasker Tweet: आज महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्वरानं (Swara Bhasker) एक ट्वीट शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.
Swara Bhasker Tweet On Mahatma Gandhi Death Anniversary: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही तिच्या वक्तव्यांमुळे तसेच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. स्वराच्या सोशल मीडियावर पोस्ट अनेक वेळा नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. स्वराला अनेक नेटकरी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे ट्रोल करतात. आज महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनाला स्वरानं एक ट्वीट केलं आहे. स्वराच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
स्वराच्या ट्वीटनं वेधलं अनेकांचे लक्ष
स्वरा भास्करनं ट्वीटमध्ये लिहिलं की, 'गांधी हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं' स्वरानं या ट्वीटमध्ये गांधी आणि Never Forget या दोन हॅशटॅग्सचा वापर केला आहे. स्वराचं हे ट्वीट अनेकांनी रिट्वीट केलं आहे. तसेच काहींनी या ट्वीटला कमेंट्स देखील केल्या आहेत. स्वराच्या या ट्वीटला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तिच्या या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटेल का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.
गाँधी हम शर्मिन्दा हैं,
— Swara Bhasker (@ReallySwara) January 30, 2023
तेरे क़ातिल ज़िंदा हैं।#gandhipunyatithi #gandhiji #NeverForget
स्वरा ही विविध विषयांवरील तिचं मत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी स्वरानं श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबाबत देखील ट्वीट केले होते. स्वरानं रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटबाबत देखील एक ट्वीट शेअर करुन प्रतिक्रिया दिली होती. तसेच, तिनं 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाबाबत देखील पोस्ट शेअर केला होती. काही दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानं स्वरा चर्चेत होती.
स्वराचे चित्रपट
स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही महिन्यांपूर्वी स्वरा 'जहां चार यार' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचे कथानक हे चार मैत्रीणींच्या आयुष्यावर आधारित आहे. स्वराच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात.
महत्वाच्या इतर बातम्या: