Dattu More : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमातील विनोदवीर दत्तू मोरेला म्हाडाच्या लॉटरीत (Mhada Lottery) घर मिळालं आहे. विनोदवीर आता चाळीतून थेट आलिशान फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. दत्तूला एक नव्हे तर दोन घरे लागली आहेत. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने घरंदाज झाला आहे.
ठाण्यातील एका छोट्या चाळीत राहणाऱ्यआ दत्तूला म्हाडा कोकण मंडळाने काढलेल्या लॉटरीत दोन घरे लागली आहेत. ठाण्याच्या रौनक ब्लिझ आणि हायलँड स्प्रिग या दोन गृह प्रकल्पात त्याला घरे लागली आहेत.
मुक्काम पोस्ट दत्तू चाळ
दत्तू मोरे हा मुळचा ठाण्याचा (Thane) आहे. वागळे इस्टेट येथील रामनगर भागातल्या एका छोट्या चाळीत तो लहानाचा मोठा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दत्तूची होणारी प्रगती आणि त्याच्या कामाचा चढता आलेख पाहून त्याच्या चाळीला 'दत्तू चाळ' असं नाव देण्यात आलं आहे. विनोदवीराने पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली होती.
म्हाडाच्या लॉटरीत घर लागल्यानंतर चाळीबद्दल बोलताना दत्तू मोरे म्हणाला,"पहिल्याच प्रयत्नात मला म्हाडाचे घर मिळाले याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. चाळीत राहताना इतरांप्रमाणे मी देखील उंच इमारतीत फ्लॅट खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र त्यावर काहीशा मर्यादा येत होत्या. पण आता माझे हे स्वप्न साकार झाले आहे. माझे बालपण चाळीत गेल्यामुळे फ्लॅट संस्कृतीत मी कितपत रमेन, हे मला माहित नाही. तरीही मी नव्या घरात राहायला गेलो तरी चाळीबाबत माझ्या मनात कायमच अत्मियता राहिल".
दत्तू मोरेच्या पत्नीचं ठाण्यात पहिलं क्लिनिक
दत्तू मोरेला एकीकडे म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं असून दुसरीकडे त्याच्या बायकोने ठाण्यात पहिलं क्लिनिक सुरू केलं आहे. यासंदर्भात पोस्ट शेअर करत अभिनेत्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याने लिहिलं आहे,"घुनागे हॉस्पिटलनंतर .. बायकोच ठाण्यातल पाहिलं क्लिनिक..अजून एक नवीन सुरूवात...प्रिय बायको..तुला खूप-खूप शुभेच्छा आणि खूप-खूप प्रेम". दत्तू मोरेवर चाहते सध्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
संबंधित बातम्या